प्रशांत जवेरी : नंदुरबार | नवापूर शहरात अमन पार्क येथे दोन गटामध्ये तुंबळ हाणामारीची घटना घडली आहे. तलवारी, लोखंडी पाईप,लाठ्या काठ्याने दोन गटांनी एकमेकांवर जोरदार हल्ला केला. यात चार जण जखमी झाले आहे.
त्यांच्यावर नवापूर शहरात प्राथमिक उपचार करून गुजरात राज्यात पुढील उपचारासाठी रवाना केले आहे. शहरातील स्टेशन रोड जवळील अमन पार्क येथे किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाली यामध्ये घरातील टीव्ही, कपाट, खिडक्या याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरात तोडफोड करून नुकसान केले आहे शेजारी सोबत किरकोळ कारणावरून है भांडण झाले दोन्ही गटात बाचाबाची झाली आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले.यात मोटरसायकल व संसारोपयोगी साहित्याची तोड करण्यात आली आहे. यासंदर्भात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.