Nandurbar
Nandurbar Team Lokshahi
ताज्या बातम्या

Nandurbar; वर्षभरात ९२ टक्के गुन्हे उघड, जिल्हा पोलीस दलाची दमदार कामगिरी

Published by : shweta walge

प्रशांत जव्हेरी, नंदुरबार; गेल्या वर्षभरात जिल्ह्यात झालेल्या गुन्ह्यांच्या तुलनेत ९२ टक्के गुन्हे उघडकीस आणण्यात जिल्हा पोलिस दलाला यश आले आहे . शिवाय गुन्हे शाबितचे प्रमाण ३८ टक्के आहे .

नंदुरबार जिल्हा पोलिस दल गुन्हेगारांवर वचक आणि कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यात यशस्वी झाले आहे. हे नंदुरबार जिल्हा पोलिस दलाने २०२२ मध्ये केलेल्या वार्षिक कामगिरीवरून स्पष्ट होते. जिल्ह्यात २०२२ मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतर्गत एकूण ६ हजार ८४ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ५,५७८ गुन्हे उघडकीस आणण्यात नंदुरबार जिल्हा पोलिस दलाला यश आले असून दाखल गुन्ह्यांपैकी उघडकीस गुन्ह्यांचे प्रमाण ९२ टक्के आहे त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्हा पोलिस दलाचे गुन्हे शाबितीचे प्रमाणदेखील ३८ टक्के आहे. जिल्ह्यात खूनाचे एकूण ३५ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ३५ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिस दलाला यश आले आहे. खूनाच्या दाखल गुन्ह्यांपैकी उघडकीस गुन्ह्यांचे प्रमाण १०० टक्के आहे. त्याचप्रमाणे खूनाचा प्रयत्न करण्याचे ३५ गुन्हे घडले असून सर्व गुन्हेउघडकीस आले आहेत. मालमत्तेविरुध्दचे दरोड्याचे ९ गुन्हे दाखल असून सर्व गुन्हे उघडकीस आहेत. तसेच एकूण मालमत्तेविरुद् ८७३ गुन्हे दाखल असून २४६ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच प्रमाणे बलात्कार विनयभंग व इतर महिलांविरूदचे अशा एकूण ३३३ दाखल गुन्ह्यांपैकी ३२१ गुन्हे उघडकीस आले असून त्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. महिलांविषयक दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

जिल्हा पोलिस दलाकडून गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यानी सांगितले.

घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, दोषींवर कारवाई करण्यासाठी CM शिंदेंनी दिल्या सूचना

T20 वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा घेणार निवृत्ती? हार्दिक पंड्याच्या निवडीबाबत मोठी अपडेट आली समोर

दिनविशेष 14 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मुंबई, ठाणे, रायगडला अवकाळी पावसानं झोडपलं! वादळी वाऱ्यामुळं घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं, ४ जणांचा मृत्यू

"राहुल गांधी तुम्ही पाकिस्तानला घाबरा पण आम्ही भाजपवाले आहोत", पालघरमध्ये अमित शहांचा इंडिया आघाडीवर घणाघात