Narali Purnima 2025 : नारळीपौर्णिमा हा कोळीबांधवांशी संबधित असा सण आहे. कारण हा सण समुद्राशी असलेले नाते आणि त्याचे ऋण फेडणारा असा दिवस असतो. त्यामुळे हा दिवस कोळी बांधव मोठ्या आनंदात साजरा करतात. अशा या खास दिवसासाठी नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा सोशल मीडिया स्टेटसवर ठेवा.
दर्या सागर हाय आमुचा राजा…
त्याच्या जीवावर आम्ही करितो मजा…
नारली पुनवेला नारळ सोन्याचा…
सगळे मिळूनशी मान देताव दर्याला…
सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!
सण नारली पुनवेचा,
दर्या सारंगा नमन तुजला !
सर्व बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा...!
कोळीवारा सारा सजलाय गो
कोळी यो नाखवा आयलाय गो
मासळीचा दुष्काळ सरु दे
दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे
सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा...!
"नारळी पौर्णिमेनिमित्त तुम्हाला
आणि तुमच्या कुटुंबाला आनंद घेऊन येवो,
समुद्र देव शुभाशिर्वाद देऊन तुम्हांला सौख्य, मांगल्य देवो
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा...!"
एक नारळ दिलाय दर्या देवाला,
वरसाचा मान देव दर्या देवाला....
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!