ताज्या बातम्या

उद्धव ठाकरेंनी माझीही सुपारी दिली होती, देशाबाहेरच्या गँगस्टर...; नारायण राणेंचे गंभीर आरोप

"गुरु शरद पवार यांनी दिलेलं काम संजय राऊतांनी पूर्ण केलं आहे. संजय राऊतांनी सरकार पाडून पहिलं काम केलं, त्यानंतर आता जखमेवर मीठ चोळण्याचं काम आता ते करत आहेत."

Published by : Sudhir Kakde

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्या सामनातील मुलाखतीवर निशाणा साधला. मुख्यमंत्री होते तेव्हा उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) हिंदुत्व, मराठी माणूस आठवला नाही, आता मात्र ते सविस्तर भावना व्यक्त करत आहेत. मात्र सत्ता गेल्यानंतर होणारा हा जळफळाट आहेत, ते मुख्यमंत्री पद गेल्यानं व्याकूळ झाले आहेत. ते म्हणतायेत पद गेल्याचं मला दु:ख नाही. मात्र मी उद्धव ठाकरेंना फार पुर्वीपासून ओळखतो. ते प्रचंड कपटी, दृष्ट बुद्धी असलेला तो माणूस आहे. आता मुलाखतीत सांगत आहेत की, मी आजारी होतो, माझं ऑपरेशन झालं, मी शुद्धीवर नसताना सरकार पाडलं असं ठाकरे म्हणत आहेत. मात्र ते शिवसैनिक होते, त्यांनीच सत्ता आणली. उद्धव ठाकरेंशी ज्यावेळी त्यांचं जमलं नाही, उद्धव ठाकरे पक्षपात करायचे, त्यामुळे शिवसैनिकांनी वेगळा गट स्थापन केला. राणे संजय राऊत यांच्यावर आरोप करताना म्हणाले, संजय राऊत आनंदात आहेत. गुरु शरद पवार यांनी दिलेलं काम संजय राऊतांनी (Sanjay Raut) पूर्ण केलं आहे. संजय राऊतांनी सरकार पाडून पहिलं काम केलं, त्यानंतर आता जखमेवर मीठ चोळण्याचं काम आता ते करत आहेत.

"एकनाथ शिंदेच नाही, माझीही सुपारी दिली होती"

उद्धव ठाकरे हे आमदारांना वेळ देत नाहीत, शिवसैनिकांना वेळ देत नाहीत. एकनाथ शिंदेंना मारायची सुपारी देखील दिल्याचं मी वृत्तपत्रात वाचलं. बाळासाहेब ठाकरेंनी तयारी केलेली माणसं कमी करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. रमेश मोरे, ठाण्याचे नगरसेवक अशा अनेकांच्या सुपाऱ्या दिल्या. माझी सुद्धा सुपारी यांनी देशाबाहेरील, देशातील गँगस्टरना यांनी सुपाऱ्या दिल्या. आता म्हणत आहेत की, मातोश्रीवर गेल्यावर मी रिलॅक्स झालो, मग वर्षावरुन जाताना का दु:ख झालं असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला. अडीच वर्षात फक्त तीन तास मंत्रालयात गेले, जर तुम्ही आजारी होते तर मुख्यमंत्री झाले कशाला असं म्हणत नारायण राणेंनी त्यांच्यावर एकेरी भाषेत उद्धव ठाकरेंवर टीका केली.

"स्वत: मर्द असल्याचं सिद्ध केलं आहे का?"

उद्धव ठाकरेंवर बोलताना ते म्हणाले की, नेहमी मर्द मर्द म्हणत असतात. मात्र ते स्वत: मर्द असल्याचं सिद्ध केलं आहे का? ते सर्व काम दुसऱ्यांकडून करुन घेतात असं राणे म्हणाले. एकनाथ शिंदेंनी नेमकं काय दिलं? फक्त उद्धव ठाकरेंना देता आलं नाही ते दिलं. प्रेम दिलं, अडचणीच्या काळात साथ एकनाथ शिंदेंनी दिलं, म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेऊन हे पन्नास आमदार गेले असं राणे म्हणाले. संजय राऊतांनी सेना संपवली आणि आता प्रश्न विचारायला लाज कशी वाटत नाही, तरी तुम्ही मुलाखत घेतात असं राणे म्हणाले. १९ जून १९६६ चा मी शिवसैनिक आहे. शिवसैनिक म्हणून आम्ही जे सोसलं, प्राण पनाला लावून बाळासाहेबांसाठी काम केलं. कारण बाळासाहेब हे आमचं प्रेम नाही तर वेड होतं असं राणे म्हणाले.

"एकनाथ शिंदेंकडे खातं आणि आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे काम करणार..."

उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांना त्रास दिला आहे. एक दिवस क्रमवार मी यांनी बाळासाहेबांना त्रास दिला. बाळासाहेबांच्या आदेशावर आम्ही काम करत गेलो. मुंबईत दंगली झाल्या, शिवसैनिक मरत होते, त्यावेळी पडलेले मृतदेह कधी उचचलेत का? असा सवाल राणेंनी केला. एकनाथ शिंदेंकडे खातं आणि आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे काम करणार...हा त्रास एकनाथ शिंदेंनी सहन केला. मी जर असतो तर हा त्रास सहन केला नाही. यापूढे आता महाराष्ट्रात शिवसेना उभी राहणार नाही. हिंदुत्व सोडून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेलेल्यांनी हिंदुत्वाच्या गप्पा मारु नये. रात्री शरद पवारांच्या घरी जाऊन जे बोललात, तो एकनाथ शिंदे यांच्यासोबत केलेला विश्वासघात होता असं राणे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?