Narayan Rane 
ताज्या बातम्या

उमेदवारी जाहीर होताच नारायण राणेंची तोफ धडाडली, जोरदार शक्तिप्रदर्शन करत म्हणाले, "४०० पारमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गचा..."

भारतीय जनता पक्षाने रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेसाठी नारायण राणे यांची उमेदवारी काल गुरुवारी जाहीर केली. याच पार्श्वभूमीवर राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.

Published by : Naresh Shende

भारतीय जनता पक्षाने रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेसाठी नारायण राणे यांची उमेदवारी काल गुरुवारी जाहीर केली. याच पार्श्वभूमीवर राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी जनतेला संबोधीत करताना राणे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अबकी बार ४०० पार, असा संकप्ल नरेंद्र मोदींनी केला आहे. भाजप आणि मित्रपक्ष मिळून ४०० पार जागा जिंकायच्या आहेत. या ४०० जागांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गचा खासदार असावा, असं आवाहन राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील जनतेला केलं आहे.

नारायण राणे जनतेला संबोधीत करताना म्हणाले, अबकी बार ४०० पार, असा संकप्ल नरेंद्र मोदींनी केला आहे. भाजप आणि मित्रपक्ष मिळून ४०० पार जागा जिंकायच्या आहेत. भारत विकसीत देश बनवण्यासाठी या जागा जिंकायच्या आहेत. भारतातील गरिबी जाऊन आत्मनिर्भर भारत बनावा, यासाठी मोदी तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅट्ट्रीक करणार आहेत. त्यांची हॅट्ट्रीक करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. या ४०० पारमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गचा खासदार असावा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. प्रमोद सावंद, उदय सामंत, किरण सामंत, दिपक केसरकर, रविंद चव्हाण यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांचा मी ऋणी आहे.

भाजपने नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर केल्यानं ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांना या निवडणुकीत तगडं आव्हान असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राऊतांनी प्रचारसभांच्या धडाका लावून राणेंवर तोफ डागली होती. राणेंच्या विरोधात आरोपांची राळ उठवणाऱ्या राऊतांना राणेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अशातच आता राणे विरुद्ध राऊत असा राजकीय संघर्ष रंगणार असून या लोकसभा निवडणुकीत कोकणात विजयाचा गुलाल कोण उधळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा