Narayan Rane
Narayan Rane Team Lokshahi
ताज्या बातम्या

राणांसाठी धावून येणार नारायण राणे; म्हणाले, कोण अडवतो मी पाहतो...

Published by : Sudhir Kakde

मुंबई : मुंबईत आज हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मातोश्रीवर (Matoshree) जाऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाचण्याचा हट्ट धरलेल्या राणा (Navneet-Ravi Rana) दाम्पत्यांनी आपला निर्णय मागे घेतला आहे. त्यानंतर आता शिवसैनिकांनी (Shivsena) आक्रमक होत राणा दाम्पत्यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना घराबाहेर पडू देणार नाही असं शिवसैनिक म्हणाले आहेत. यावरुन आता नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि शिवसेनेवर यावेळी गंभीर आरोप केले. राणा दाम्पत्याला जर बाहेर पडू देत नसतील तर मी तिथे जाईल आणि त्यांना बाहेर काढेल असं राणे म्हणाले.

मातोश्री आणि राणा दाम्पत्याच्या घराबाहेर हजारो वगैरे नाही तर 200-300लोक असल्याचं राणे म्हणाले. राणांच्या घराबाहेरून पोलिसांनी बाजुला व्हावं राणा स्वत: चालत बाहेर येतील असं राणे म्हणाले. तसंच केंद्रीय यंत्रणा योग्य वेळेवर योग्य कारवाई करतील असंही नारायण राणे म्हणाले.

दिशा सालियान प्रकरणात मला बोलावलं आणि विचारलं सुशांत सिंहच्या मृत्यूबद्द तुम्हाला काय माहितीये? त्यावेळी मी सांगितलं तुम्हाला माहिती तेच मला माहिती आहे. दिशा सालियानवर पार्टीत अत्याचार झाला. तिच्या गाडीत ती घरी जाताना कोण होतं? घरी देखील तिच्यावर अत्याचार करण्यात आले आणि तिला वरुन फेकून दिलं असं राणे म्हणाले.

संजय राऊत यांनी नवणीत राणांवर खोट्या कागदपत्रांच्या आधारे खासदार झाल्याचा आरोप केला. त्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले संजय राऊत यांनी मी खासदार केलं. बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले होते, जा यांना खासदार कर. त्यावेळी खोटे कागदपत्र सादर केले. मतदार यादीतही संजय राऊत यांचं नाव नव्हतं असं नारायण राणे म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांच्या सभेत घोषणा देणाऱ्या तरुणाने घेतली शरद पवार यांची भेट

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र; म्हणाले...

शिरूर मतदारसंघाच्या ईव्हीएम स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही 24 तास बंद

Shambhuraj Desai : 4 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा चांगल्या मताधिक्याने माननीय नरेश म्हस्के साहेब निवडून येतील

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा