Narendra Modi and Uddhav Thackeray  team lokshahi
ताज्या बातम्या

पंतप्रधान, मुख्यमंत्री उद्या एकत्र एकाच मंचावर दिसणार

मुंबईतील राजभवन येथे क्रांतिकारी गॅलरीचे पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते उद्घाटन

Published by : Shweta Chavan-Zagade

शिवसेना (ShivSena) आणि भाजपचे (BJP) राज्यातील नेते एकमेकांसमोर उभे ठाकले असताना उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) उद्या (14 जून) एकाच मंचावर दिसणार आहेत. मुंबईतील राजभवन इथे उद्या (14 जून) पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते क्रांतिकारी गॅलरीचं उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती असेल.

एप्रिल महिन्यात लता मंगेशकर फाऊंडेशन (Lata Mangeshkar Foundation) पुरस्कार घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी कार्यक्रम पत्रिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांचं नाव नसल्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाला जाणं टाळलं होतं. मात्र राजभवनात उद्या दुपारी चार वाजता क्रांतिकारी गॅलरीचं उद्घाटन होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देखील उपस्थित असणार आहेत.

पंतप्रधान एक दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांचा पहिला कार्यक्रम पुण्यातील देहूमध्ये (Dehu) आहे. संत तुकाराम महाराज (Saint Tukaram Maharaj) यांच्या मूर्तीचं अन् शिळा मंदिराचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मुंबईत येणार आहेत. सी विद्यासागर राव राज्यपाल असताना राजभवनात एक भुयार सापडलं होतं, त्या भुयारात गॅलरी स्थापन करण्यात आली आहे.

या गॅलरीमध्ये चाफेकर बंधू तसंच सावरकर बंधू यांची चित्रे आणि प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याचं उद्धाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार की नाही याची चर्चा असताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्धव ठाकरे कार्यक्रमाला हजर राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एकत्र एका कार्यक्रमात दिसतील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा