Narendra Modi  
ताज्या बातम्या

Narendra Modi Oath Ceremony : देशात NDA चं सरकार स्थापन; राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ

राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. जवळपास आठ हजार विशेष पाहुण्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला.

Published by : Naresh Shende

मोNarendra Modi Oath Ceremony 2024 Updates : लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात एनडीएने (राष्ट्रीय लोकसेवा आघाडी) २९४ जागांचं बहुमत मिळवून सरकार स्थापन केलं. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. जवळपास आठ हजार विशेष पाहुण्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी सुरक्षा यंत्रणांच्या कडेकोट बंदोबस्तात नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाची आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली. राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत अनेक मंत्र्यांनी शपथ घेतलीय. मोदींच्या शपथविधी सोहळ्याला विदेशातील महत्त्वाच्या नेत्यांसह भारतातील कला, क्रीडा, उद्योग क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते.

नरेंद्र मोदींनंतर राष्ट्रपतींनी राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, जे पी नड्डा, शिवराज सिंह चौहान, निर्मला सितारामन, एस जयशंकर, मनोहरलाल खट्टर, एच डी कुमारस्वामी, धर्मेंद्र प्रधान, पीयुष गोयल, जीतनराम मांझी, राजीव रंजन, सर्वानंद सोनेवाल, डॉ. विरेंद्र कुमार, राम मोहन नायडू, प्रल्हाद जोशी, ज्युवेल ओराम, अश्विनी वैष्णव, ज्योतिरादित्य शिंदे, भुपेंद्र यादव, गजेंद्रसिंह शेखावत, अन्नपूर्णा देवी, किरेन रिजीजू, हरदिप सिंह पूरी, मनसुख मांडवीया, जी किशन रेड्डी, चिराग पासवान, चंद्रकांत पाटील यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

तर राज्यमंत्री म्हणून राव इंद्रजीत सिंग, जितेंद्र सिंग, अर्जुन राम मेघवाल, प्रतापराव जाधव, जयंत चौधरी, जितिन प्रसाद, श्रीपाद नाईक, पंकज चौधरी, कृष्णपाल गुर्जर, रामदास आठवले, रामनाथ ठाकूर, नित्यानंद राय, अनुप्रिया पटेल, व्ही सोमण्णा, चंद्रशेखर पेम्मासानी, शोभा करंदलाजे, किर्तीवर्धन सिंग, व्हि एल वर्मा, शंतनू ठाकूर, सुरेश गोपी, एल मुरुगन, अजय टमटा, बंडी संजय कुमार, कमलेश पासवान, भागीरथ चौधरी, सतीशचंद्र दुबे, संजय सेठ, रवनीत सिंह, दुर्गादास उईके, रक्षा खडसे, सुकांता मुजूमदार, सावित्री ठाकूर, राजभूषण चौधरी, भूपती राजू श्रीनिवास, हर्ष मल्होत्रा, निमूबेन बंभानिया, मुरलीधर मोहोळ, जॉर्ज कुरियन, पवित्रा मार्गेरिटा यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : अशिष शेलार आणि जयंत पाटील यांची विधान परिसरात भेट

Stock Market : शेअर बाजारात गुजरातची मोठी झेप; 1 कोटी गुंतवणूकदारांचा टप्पा पार

MNS In Pune : राज ठाकरेंविरोधातील वादग्रस्त वक्तव्य भोवलं; 'तो फटके खाणारचं...', मनसे कार्यकर्ते आक्रमक

Latest Marathi News Update live : मामा राजवाडेंचा भाजप पक्षप्रवेश थांबवला