शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे आधुनिक जगातले औरंगजेब आहेत, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबावरुन वातावरण तापलं आहे.
यातच आता नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, "उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या दिवसांत बाळासाहेब ठाकरे यांना त्रास दिला. ते नेहमी राज ठाकरे यांनी व्यक्त केलेलं आहे."
"त्यांनी आपल्या वडिलांच्या विचारांची प्रॉपर्टी घेतली नाही. तर त्यांनी आपल्या सख्ख्या भावांना प्रॉपर्टी करता त्रास दिला. ते वाद कोर्टापर्यंत गेले. बाळासाहेबांना यातना दिलेल्या आहेत. असे हे उद्धव ठाकरे आधुनिक जगातले औरंगजेब आहेत. आपल्या भावांचासुद्धा त्यांनी प्रॉपर्टीसाठी काटा काढला. जे आपल्या भावांचे नाही झालं ते जनतेचे काय होणार आहेत?" असे नरेश म्हस्के म्हणाले.