ताज्या बातम्या

लोकसभेला अजितदादांनासोबत घेतलं म्हणून फटका बसला या चर्चेवर नार्वेकर स्पष्ट म्हणाले...

लोकशाही संवाद या कार्यक्रमात राहुल नार्वेकर यांच्यासोबत मुलाखत झाली. लोकसभेला अजितदादांनासोबत घेतलं म्हणून फटका बसला या चर्चेवर नार्वेकर स्पष्ट म्हणाले.

Published by : Dhanshree Shintre

लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2024' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'लोकशाही संवाद 2024' या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला आता सुरुवात झाली आहे. दिवसभर मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमात महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दलही चर्चा होणार आहे.

लोकशाही संवाद या कार्यक्रमात राहुल नार्वेकर यांच्यासोबत मुलाखत झाली. या मुलाखतीत राहुल नार्वेकर यांना एक प्रश्न विचारण्यात आला की लोकसभेला अजितदादांनासोबत घेतलं म्हणून फटका बसला या चर्चेवर नार्वेकर म्हणाले की, कुठच्याही आघाडी किंवा कुठच्याही युतीमध्ये मतभेज असू शकतात आणि असायलाच पाहिजे.

सगळ्याच गोष्टींवर जर का आपण एकमताने निर्णय घ्यायला लागलो, तर मग आपण चुकतोय कुठे किंवा सुधार कुठे करावा हे कधी होणारच नाही आणि त्यामुळे मला वाटतं मतभेद असतात. परंतू, मतभेद जरी असले तरी शेवटी जो निर्णय पक्षश्रेष्ठी घेते, तोच निर्णय सगळ्या पक्षातील लोकांना सगळ्यांना मान्य असतं, असे राहुल नार्वेकर हे लोकशाही संवाद 2024 च्या मुलाखतीत म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा