पालकमंत्रिपदावरुन अनेक चर्चा सुरु आहेत. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला असल्याची माहिती मिळत आहे.
नाशिकचे पालकमंत्री पद भाजपकडेच राहणार असून गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री होणार असल्याची माहिती मिळत असून सिहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचे पालकमंत्री पद अन्य कुणाला दिले जाणार नाही.
भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाचा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना स्पष्ट संदेश देण्यात आल्याची माहिती असून रायगड पालकमंत्री पदाचा तिढा मात्र अजूनही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. रायगड पालकमंत्री पदाचा पेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्र बसून सोडवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.