Nashik Major Dispute Among Candidates Was Witnessed Over The Evm Nashik Mahapalika Election News Marathi 
ताज्या बातम्या

Nashik Election 2026 : EVM वर बटण दाबलं, पण लाईट आलंच दुसऱ्या पक्षाचं! नाशिकमध्ये राजकीय खळबळ

Nashik Election 2026 News: आठ वर्षांनंतर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक अखेर आज पार पडत आहे. तब्बल तीन वर्षे प्रलंबित असलेल्या या निवडणुकीत 122 जागांसाठी गुरुवारी मतदान होत असून शहरातील सुमारे 13.6 लाख मतदार आपला हक्क बजावत आहेत.

Published by : Riddhi Vanne

Nashik Election 2026 News: आठ वर्षांनंतर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक अखेर आज पार पडत आहे. तब्बल तीन वर्षे प्रलंबित असलेल्या या निवडणुकीत 122 जागांसाठी गुरुवारी मतदान होत असून शहरातील सुमारे 13.6 लाख मतदार आपला हक्क बजावत आहेत. या निवडणुकीत भाजप स्वबळावर पुन्हा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. तर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे एकत्र येत विरोधकांनी ताकद एकवटली आहे. दुसरीकडे शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत. याशिवाय डावे पक्ष, आम आदमी पार्टी आणि बसपाही काही प्रभागांत रिंगणात आहेत.

2017 साली भाजपने नाशिक महापालिकेवर पूर्ण बहुमत मिळवले होते. मात्र मनपाची मुदत 2022 मध्ये संपल्यानंतर निवडणूक रखडली होती. आजच्या मतदानादरम्यान काही ठिकाणी गोंधळाचे प्रकार समोर आले आहेत. प्रभाग क्रमांक 24 मधील एका मतदान केंद्रावर ईव्हीएमबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे.

धनुष्यबाण चिन्हावर मतदान केल्यावर वेगळ्याच चिन्हाचा प्रकाश दिसत असल्याचा दावा शिंदे गटाच्या उमेदवारांकडून करण्यात आला आहे. या आरोपांनंतर काही मतदारांनी लेखी तक्रारी दाखल केल्या असून मतदान केंद्रावर काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणी शिवसेनेच्या उमेदवारांनी गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने 1563 मतदान केंद्रांवर सुमारे 8,800 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ईव्हीएममध्ये अडचण आल्यास तातडीने बदल करता यावा यासाठी अतिरिक्त यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे.

थोडक्यात

• नाशिक महानगरपालिकेची निवडणूक आठ वर्षांनंतर आज पार पडत आहे.
• तब्बल तीन वर्षे प्रलंबित राहिलेल्या निवडणुकीत मतदान
• 122 जागांसाठी गुरुवारी मतदान होत आहे.
• शहरातील सुमारे 13.6 लाख मतदार आपला हक्क बजावत आहेत.
• नाशिकमध्ये निवडणुकीस मोठा राजकीय आणि लोकशाही महत्व...

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा