सध्या अवकाळी पावसाने थैमान घातलेले आहे. तर दुसरीकडे रस्ते खोदकामांमुळे नाशिक शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. ठिकठिकाणी "खड्यांमध्ये रस्ते" शोधताना नागरिकांची तारांबळ उडाली आहे . त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्याबरोबरच नागरिकांना वाहतुक कोंडीला ही सामोरे जावे लागत आहे. यावर ठोस काही उपाययोजना करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने गुरुवारपासून MNGL , स्मार्ट सिटी कंपनी सहसर्व खाजगी कंत्राटदारांना रस्ते खोदकामास बंदी घातली आहे.
रस्ता पावसाळ्यात खड्डेमय होताना दिसतो. मात्र अवकाळी पावसाने यंदा एक महिना आधीच हे दृश्य दाखवले आहे. त्यातच MNGL , स्मार्ट सिटी कंपनी ,CCTV कॅमेरे, सिग्नल signal यंत्रणा आदी कामांसाठी गेल्या दोन महिन्यांपासून खोदकाम सुरु आहे. या खोदकामामुळे आधीच रस्त्यात मोठमोठे खड्डे करण्यात आले आहेत. अवकाळी पावसामुळे ह्या खड्यांमध्ये पाणी साचत असून पावसामुळे खड्यांची माती रस्त्यावर येत आहे त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे.
त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्याबरोबरच नागरिकांना रस्त्यावर चालणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळेच नाशिक महानगरपालिकेने MNGL , स्मार्ट सिटी कंपनी smart company सह सर्व खाजगी कंत्राटदारांना रस्ते खोदकामास बंदी सक्तीने घातली आहे. मान्सूनपूर्व रस्तादुरुस्तीची कामे 15 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.