ताज्या बातम्या

Vikram Gaikwad Passed Away : सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड काळाच्या पडद्याआड; कला क्षेत्रात पसरली शोककळा

भारतीय चित्रपट आणि रंगभूमी क्षेत्रातील ख्यातनाम रंगभूषाकार, राष्ट्रीय पुरस्कार विजेते विक्रम गायकवाड यांच्या निधनाने संपूर्ण कला आणि सिनेमा विश्वावर शोककळा पसरली आहे.

Published by : Team Lokshahi

भारतीय चित्रपट आणि रंगभूमी क्षेत्रातील ख्यातनाम रंगभूषाकार, राष्ट्रीय पुरस्कार विजेते विक्रम गायकवाड यांच्या निधनाने संपूर्ण कला आणि सिनेमा विश्वावर शोककळा पसरली आहे. रंगभूषेच्या क्षेत्रात अत्युच्च दर्जाची कौशल्ये दाखवत त्यांनी आपल्या अद्वितीय सर्जनशीलतेद्वारे असंख्य पात्रांना अजरामर केले. बालगंधर्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य: एक युगपुरुष, सरदार यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांमधील व्यक्तिरेखांना त्यांच्या रंगभूषेने जिवंत रूप दिले. केवळ मराठी आणि हिंदी नव्हे, तर पोन्नियन सेल्व्हन सारख्या दाक्षिणात्य चित्रपटांमधूनही त्यांचा अभिनयाच्या सौंदर्यात भर घालणारा हातभार चांगलाच गाजला.

विक्रम गायकवाड हे केवळ रंगभूषाकार नव्हते, तर ते कलाकारांच्या भावविश्वाचा भाग होत. त्यांचा प्रत्येक स्पर्श हा पात्राच्या आत्म्यात जीव फुंकणारा ठरला. त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत हिंदी, मराठी, दाक्षिणात्य अशा विविध भाषांतील चित्रपट आणि नाटकांमध्ये आपल्या कला कौशल्याचा ठसा उमठवला. त्यांच्या निधनामुळे केवळ एक कुशल रंगभूषाकारच नाही, तर चित्रपट व रंगभूमीवर सारख्याच ताकदीने कार्य करणारा एक कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या योगदानाची पोकळी भरून काढणे अशक्य आहे, अशा भावना व्यक्त होत आहेत.

अभिनेते सुबोध भावे व्यक्त होताना लिहतात " विक्रम सारखा कलावंत या मातीत घडला हे आमचं भाग्य. कितीतरी कलाकारांच्या आयुष्यात त्याने त्यांच्या भूमिकेला भिडण्याचे धैर्य दिले आहे. माझ्या आयुष्यात बालगंधर्व, लोकमान्य, कट्यार काळजात घुसली, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर आणि तुला पाहते रे या सर्व कलाकृतींमध्ये तुझे योगदान अभूतपूर्व आहे. तुझ्याशिवाय या भूमिकांचा विचार ही मी करू शकत नाही.तुझ्या सारखा कलावंत आमच्या आयुष्यात आला आणि आम्हाला समृद्ध करून गेला. माझ्या साठी तू कायमच जिवंत आहेस."

विक्रम गायकवाड यांच्या निधनाने हिंदी व मराठी सिनेसृष्टीमधून हळहळ व्यक्त होत आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा