ताज्या बातम्या

Cyclone Ditwah : श्रीलंकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर; दित्वाह चक्रीवादाळामुळे मृतांचा आकडा १५० पार

श्रीलंकेत (Sri Lanka) दित्वाह चक्रीवादळाने (Cyclone) प्रचंड कहर केला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रपती कुमार दिसानायके यांनी देशभारात आणीबाणीची घोषणा जाहीर केले आहे.

Published by : Varsha Bhasmare

श्रीलंकेत (Sri Lanka) दित्वाह चक्रीवादळाने (Cyclone) प्रचंड कहर केला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रपती कुमार दिसानायके यांनी देशभारात आणीबाणीची घोषणा जाहीर केले आहे. सध्या परिस्थिती सुरळित करण्याचे कार्य सुरु आहे.

मृतांचा आकडा १५० पार, शेकडो बेपत्ता

मीडिया रिपोर्टनुसार, मृतांचा आकडा १५० पार झाला असून परिस्थिती अद्यापही बिकट आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे लोकांच्या मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत. शेकडो लोक बेपत्ता झाले आहे. श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, तीव्र हवामानामुळे मृतांचा आकडा १५० पार झाला आहे. तसेच १९१ लोक अद्यापही बेपत्ता आहेत. बेपत्ता लोकांचा शोध घेणे सुरु आहे. तसेच पूरात अडकेलेल्यांना बाहेर काढण्याचे कार्यही सुरु आहे. या वादळामुळे २५ जिल्ह्यांतील २१ हजारांहून अधिक कुटुंब बाधित जाले आहेत.

देशात आणीबाणीची स्थिती जाहीर

बिघडती परिस्थिती पाहता श्रीलंकेचे राष्ट्रापती अनुरा कुमार दिसानायके यांनी राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली आहे. पूर, भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे अनेक भागता भीषण परिस्थिती आहे. सध्या लोकांच्या बचावाचे कार्य सुरु असून देशभरात 798 मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत.

भारताचे ऑपरेशन सागर बंधू

भारताने नेबरहूड फर्स्ट धोरणाअंतर्गत ऑपरेशन सागर बंधू राबवत श्रीलंकेला मोठा मानवतावादी मदत पाठवली आहे. भारताच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) आणि शनिवारी(२९ नोव्हेंबर) रात्री हिंडव हवाई तळावरुन C-130 आणि एक IL-76 विमान हे मानवतावादी मदत घेऊन रवाना झाले आहेत. भारताने श्रीलंकेला २१ टन मदत साहित्य पाठवले आहे. तसेच NDRF चे आठ कर्मचारी आणि काही उपकरे देखील पाठवण्यात आली आहे. गरजू लोकांना अन्न, पाणी, टेंट्स अशा आवश्यक वस्तूं पोहोचवण्यात आल्या आहेत.

चक्रीवादळ भारताच्या दिशेने

श्रीलंकेत धुमाकूळ घातल्यानंतर चक्रीवादळ दित्वाह आता भारताच्या दक्षिण किनाऱ्याच्या दिशेने वेगाने सरकत आहे. हवामान खात्याने दिलेल्य माहितीनुसार, आज सकाळी (दि.३०) हे वादळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर पोहोचेल, असा अंदाज आहे. सध्या तामिळनाडूच्या अनेक किनारी जिल्ह्यांमध्ये आधीच मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. त्यानंतर आता या चक्रीवादळाचे संकट आहे. यामुळे भारत हाय अर्ट मोडव आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा