ताज्या बातम्या

National Film Awards 2025 : शाहरुख खानला त्याचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर! जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी

विज्ञान भवन येथे आयोजित 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात हिंदीसह प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांचा सन्मान करण्यात आला.

Published by : Prachi Nate

विज्ञान भवन येथे आयोजित 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात हिंदीसह प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात सर्वाधिक गाजलेली घोषणा म्हणजे शाहरुख खानला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याची.

जवान या सुपरहिट चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार देण्यात आला. तीन दशकांच्या अभिनय कारकिर्दीत अनेक व्यावसायिक आणि समीक्षकांनी त्याला भरभरून दाद दिली असली, तरी राष्ट्रीय पुरस्कार त्याच्या खात्यात पहिल्यांदाच जमा झाला आहे. त्यामुळे हा क्षण शाहरुख आणि त्याच्या चाहत्यांसाठी ऐतिहासिक ठरला.

त्याच मंचावर अभिनेत्री राणी मुखर्जी हिलाही प्रथमच राष्ट्रीय पुरस्काराचा मान मिळाला. तसेच लोकप्रिय अभिनेता विक्रांत मॅसी यांचाही या सोहळ्यात सन्मान झाला. भारतीय चित्रपटसृष्टीत अविस्मरणीय योगदान दिल्याबद्दल दिग्गज अभिनेते मोहनलाल यांना सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. पुरस्कार स्वीकारताना संपूर्ण सभागृहाने उभे राहून त्यांना दाद दिली.

समारंभाला केंद्र सरकारचे वरिष्ठ मंत्री, दिग्दर्शक आणि विविध भाषांतील दिग्गज कलाकार उपस्थित होते. हा कार्यक्रम केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित न राहता भारतीय चित्रपटसृष्टीच्या विविधतेचा उत्सव ठरला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Navaratri 2025 : दुर्गादेवीला महिषासुर -मर्दिनी का म्हणतात? , जाणून घ्या 'ही' कथा

H-1B Visa : भारतीय विद्यार्थ्यांच्या करिअरला धक्का! ; एच-१बी व्हिसा शुल्कात इतक्याची वाढ

Suresh Dhas : पूरग्रस्त नागरिकांसाठी आमदार सुरेश धसांची मोठी घोषणा

Flipkart Big Billion Sale : फ्लिपकार्टच्या सेलमध्ये मोठा झोल, Iphone ची ऑर्डर आपोआप रद्द?