महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांना एमपीएमएलए (Money Laundering Act) कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाने त्यांची जातमुचालक्यावर (PR Bond) सुटका केली.
याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चौकशी सुरू केली असून, रोहित पवार यांची याआधीही अनेक वेळा चौकशी झाली होती. तथापि, त्यांना अटक करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे अटक न झाल्याने कोर्टाने जातमुचालक्यावर सुटका देण्याचा निर्णय दिला आहे.
रोहित पवार यांच्या कोर्टातील हजेरीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे हिने देखील त्यांच्यासोबत उपस्थिती लावली होती. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला अधिक उधाण आले.
दरम्यान, या निर्णयामुळे शिखर बँक घोटाळा प्रकरणातील पुढील चौकशीची दिशा महत्त्वाची ठरणार आहे. पवार यांच्या सुटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्तुळात समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.
सरकारवर नेहमीच सूचक टीका करणारे रोहित पवार यांना अशा कारवायांना सामोरे जावे लागत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, कोर्टाकडून मिळालेल्या या निकालामुळे त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांना एमपीएमएलए (Money Laundering Act) कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाने त्यांची जातमुचालक्यावर (PR Bond) सुटका केली.