ताज्या बातम्या

महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेसचं आज देशव्यापी आंदोलन; पंतप्रधानांच्या निवास्थानाला घालणार घेराव

केंद्रातील भाजपा सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाईचा आगडोंब उसळला असतानाच जीवनाश्यक वस्तुंवरही जीएसटी लावून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू पहात आहे.

Published by : Team Lokshahi

केंद्रातील भाजपा सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाईचा आगडोंब उसळला असतानाच जीवनाश्यक वस्तुंवरही जीएसटी लावून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू पहात आहे. बेरोजगारीचा उच्चांक झाला असून तरुणवर्गाचे भवितव्य अंधारात आहे. महागाई, बरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत म्हणून उद्या शुक्रवार दि. ५ ऑगस्ट रोजी राजभवनला घेराव घातला जाणार असून त्यानंतर जेलभरो करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.मुंबईत उद्या सकाळी ११ वाजता हँगिंग गार्डन ते राजभवन असा मोर्चा काढून राजभवनला घेराव घातला जाईल व त्यानंतर जेलभरो केले जाणार आहे. राज्यात सर्व जिल्हा मुख्यालयी स्थानिक नेते आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवतील.

काँग्रेसच्या मुख्यालयात गुरुवारी रात्रीपासूनच काँग्रेस कार्यकर्ते जमू लागले. मात्र, दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. "जंतर-मंतर वगळता, नवी दिल्ली जिल्ह्यातील संपूर्ण भागात CrPC कलम 144 लागू आहे. सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था, रहदारीच्या कारणांमुळे 5 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली जिल्ह्यातील परिसरात आंदोलन/धरणे/घेरावाला परवानगी देता येणार नाही," असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं. यावर राहुल गांधी म्हणाले की, "लोकशाहीत आंदोलन करणे हा आमचा अधिकार आहे. पोलीस परवानगी देत ​​नाहीत, ठीक आहे, रोखून दाखवा."

दिल्लीत राष्ट्रपती भवनावर मोर्चा तर विविध राज्यात राजभवनाला घेराव घालण्यास काँग्रेसने सांगितलं आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने 5 ऑगस्ट रोजी 'राजभवन घेराव' आयोजित करण्यास सांगितलं आहे, ज्यात आमदार, विधानपरिषदेचे सदस्य, माजी खासदार आणि राज्य युनिटचे वरिष्ठ नेते सहभागी होतील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...