Admin
ताज्या बातम्या

तुर्की आणि सीरियामध्ये नैसर्गित आपत्ती; NDRF पथकांसह भारताची मदत तुर्कीला पोहोचली

तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी 7.8 तीव्रतेचा मोठा भूकंप झाला आणि त्यानंतर 40 हून अधिक भूकंपाचे धक्के बसले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी 7.8 तीव्रतेचा मोठा भूकंप झाला आणि त्यानंतर 40 हून अधिक भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.८ इतकी मोजली गेली. शेकडो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असून अनेक बेपत्ता आहेत. तुर्की आणि सीरियामध्ये मोठी नैसर्गित आपत्ती कोसळली आहे. भूकंपामध्ये आतापर्यंत सुमारे 4000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

भारताने तुर्की आणि सीरियातील भूकंपग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी भूकंपामध्ये मृत्यू झालेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरू आहे. तुर्कस्तानमधील काही भागात हवामानात अचानक बदल झाला आहे. भीषण भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जगातील अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. तुर्की दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांच्या सांत्वन करणारे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. तुर्कीचे राष्ट्रपती रजब तय्यब एर्दोगान यांनी केलेल्या ट्विटवर पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत तुर्कीच्या लोकांच्या पाठीशी उभा आहे आणि या दुर्घटनेला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.

भारतातूनही तुर्कीसाठी मदत पाठवण्यात आली आहे. NDRF ची दोन पथकं प्रशिक्षित श्वान पथकासह तुर्कीमध्ये दाखल झालं आहे.विशेष प्रशिक्षित श्वानपथकासह एनडीआरएफच्या जवानांची दोन पथकं आणि आवश्यक उपकरणं तसेच जीवनावश्यक वस्तूंचा साठा भारतातून तुर्कीमध्ये पोहोचला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?