ताज्या बातम्या

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन; काय आहेत वैशिष्ट्ये आणि रोजगारच्या संधी?

महाराष्ट्राच्या औद्योगिक, व्यापारी आणि पर्यटन क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणारा क्षण आज आकार घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अत्याधुनिक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होणार आहे.

Published by : Prachi Nate

महाराष्ट्राच्या औद्योगिक, व्यापारी आणि पर्यटन क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणारा क्षण आज आकार घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अत्याधुनिक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे राज्याच्या विकासाला नवी झेप मिळणार आहे. हा प्रकल्प केवळ एक विमानतळ नसून महाराष्ट्राच्या भविष्यातील आर्थिक आणि औद्योगिक महामार्गाची दारं उघडणारा केंद्रबिंदू ठरणार आहे.

19,650 कोटींचा प्रकल्प : महाराष्ट्राच्या उद्योगांना जागतिक दारं

सुमारे 19,650 कोटींचा हा प्रकल्प आदाणी एअरपोर्ट्स आणि सिडको (CIDCO) यांच्या सार्वजनिक-खासगी भागीदारीत (PPP मॉडेल) साकारला गेला आहे. या विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, तो दरवर्षी दोन कोटी प्रवाशांना सेवा देण्यास सक्षम आहे. पुढील टप्प्यांमध्ये ही क्षमता 9 कोटी प्रवाशांपर्यंत वाढवली जाणार आहे. नवी मुंबई विमानतळामुळे मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि कोकण भागातील औद्योगिक क्षेत्रांना जागतिक बाजारपेठेकडे जाणारा नवा प्रवेशद्वार मिळणार आहे. निर्यात, पर्यटन, तसेच सेवा क्षेत्रातील रोजगार वाढविण्याच्या दृष्टीने हा टप्पा महत्त्वाचा ठरेल.

मुंबईच्या गर्दीला दिलासा; पुणे आणि कोकण प्रवाशांसाठी नवे केंद्र

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दररोज १,२०० हून अधिक उड्डाणे होत असल्याने तेथे ताण वाढत चालला होता. नव्या विमानतळामुळे ही गर्दी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. याचबरोबर, पुणे, कोकण आणि ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांना आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी ही सुविधा जवळ मिळणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे तांत्रिक, सौंदर्य आणि प्रवासी सोयीच्या दृष्टीने देशातील सर्वाधिक प्रगत प्रकल्प ठरणार आहे. जाणून घ्या या विमानतळाची दहा वैशिष्ट्ये...

मुंबईच्या गर्दीला दिलासा; पुणे आणि कोकण प्रवाशांसाठी नवे केंद्र

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दररोज 1,200 हून अधिक उड्डाणे होत असल्याने तेथे ताण वाढत चालला होता. नव्या विमानतळामुळे ही गर्दी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. याचबरोबर, पुणे, कोकण आणि ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांना आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी ही सुविधा जवळ मिळणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे तांत्रिक, सौंदर्य आणि प्रवासी सोयीच्या दृष्टीने देशातील सर्वाधिक प्रगत प्रकल्प ठरणार आहे. जाणून घ्या या विमानतळाची दहा वैशिष्ट्ये...

10 वैशिष्ट्यांमुळे खास – भारतातील सर्वात आधुनिक विमानतळ

  • डिसेंबरपासून सुरू होणार व्यावसायिक उड्डाणं

    उद्घाटनानंतर विमानतळावरून डिसेंबर 2025 पासून व्यावसायिक उड्डाणं सुरू होणार आहेत. पहिल्या उड्डाणाचा मान मिळवण्यासाठी एअर इंडिया, इंडिगो आणि अकासा एअर या तीन विमान कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे.

  • चार प्रवेशद्वारे आणि तीन व्यवस्थापन केंद्र

    या विमानतळाला अल्फा, ब्राव्हो आणि चार्ली अशी तीन व्यवस्थापन केंद्रं असतील. चार स्वतंत्र प्रवेशद्वारं, 88 चेक-इन काउंटर (66 पारंपरिक आणि 22 सेल्फ चेक-इन) यामुळे प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

  • सकाळी 8 ते रात्री 8 उड्डाणं

    सुरुवातीच्या टप्प्यात विमानतळावरून सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत उड्डाणं होतील. सध्या प्रतितास 10 विमानांची (10 ATM) क्षमता असून पुढे ती 40 विमानांपर्यंत वाढवली जाणार आहे.

  • चार टर्मिनल्स आणि दोन समांतर धावपट्ट्या

    एकूण 4 टर्मिनल्स आणि २ समांतर धावपट्ट्या (3,700 मीटर लांब, 60 मीटर रुंद) असणार आहेत. पहिल्या टप्प्यात एक टर्मिनल आणि एक धावपट्टी सुरू होईल, तर दुसऱ्या टप्प्याची बांधकाम प्रक्रिया सुरू आहे.

  • आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक केंद्र

    दुबई किंवा हीथ्रो विमानतळाच्या धर्तीवर हे केंद्र उभारले गेले आहे. सुरुवातीला दोन कोटी प्रवासी क्षमता असलेला हा विमानतळ, पुढे 9 कोटी प्रवाशांना वार्षिक सेवा देणारा इंटरनॅशनल एव्हिएशन हब बनेल.

  • मालवाहतूक क्षेत्रासाठी मोठं केंद्र

    पहिल्या टप्प्यात 5 लाख मेट्रिक टन वार्षिक क्षमतेचं मालवाहतूक केंद्र उभारलं आहे. अंतिम टप्प्यात येथे 32 लाख मेट्रिक टन मालवाहतूक होईल. हे केंद्र भारतातील सर्वात मोठं एमआरओ सुविधा केंद्र ठरणार आहे.

  • अत्याधुनिक लँडिंग सिस्टिम

    या विमानतळावर Category II Instrument Landing System (ILS) बसवण्यात आली आहे. त्यामुळे केवळ 300 मीटर दृश्यमानता असतानाही विमान सुरक्षितपणे उतरू शकतं, ही तंत्रज्ञान सुविधा मुंबई विमानतळापेक्षा अधिक प्रगत आहे.

  • डिजीयात्रा आणि तरुण प्रवाशांसाठी स्मार्ट सुविधा

    विमानतळ प्रशासनानुसार, भारतातील 64% प्रवासी हे Gen Z आणि मिलेनियल्स आहेत. त्यामुळे डिजीयात्रा, बायोमेट्रिक बोर्डिंग आणि डिजिटल गेट सिस्टिम यांसारख्या सुविधांनी वेळेची बचत आणि सुरक्षा वाढेल.

  • ‘फूड हॉल’ची नवी संकल्पना

    येथील फूड कोर्टऐवजी ‘फूड हॉल’ ही नवी संकल्पना राबवण्यात आली आहे. प्रवासी एका ठिकाणावरून विविध आउटलेट्सवरून ऑर्डर देऊ शकतात. येथे Bombay Brasserie, KFC, Foo, Wagamama, Bayroute यांसारखी लोकप्रिय रेस्टॉरंट्स असतील. तसेच विमानतळाच्या अ‍ॅपद्वारे बोर्डिंग गेटवरच फूड ऑर्डर करता येईल.

  • डिजिटल कलाकृती आणि भारतीय संस्कृतीचा संगम

    विमानतळावर सर्वत्र भव्य डिजिटल आर्ट इंस्टॉलेशन्स बसवण्यात आल्या आहेत. डिपार्चर गेटवर सात गोलाकार एलईडी स्क्रीन्स आणि दोन मोठे डिस्प्ले भारतीय संस्कृतीचं सौंदर्य आणि आधुनिकतेचा संगम दर्शवतील.

  • रोजगार व आर्थिक संधींचा नवा अध्याय

    या विमानतळामुळे 40,000 हून अधिक थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. हॉटेल, ट्रॅव्हल, लॉजिस्टिक्स, पर्यटन, तसेच बांधकाम क्षेत्रातील कामगारांना दीर्घकालीन संधी उपलब्ध होतील. तसेच, कोकण आणि मराठवाड्यातील फळे, मासे आणि प्रक्रिया उद्योगांच्या निर्यातीला मोठा हातभार लागेल.

  • मुंबई ते जग : नव्या झेपेची सुरुवात

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा फक्त वाहतुकीचा प्रकल्प नसून, महाराष्ट्राच्या प्रगतीची नवी झेप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज होणारे हे उद्घाटन म्हणजे महाराष्ट्राच्या विकासकथेतलं सुवर्णपान ठरणार आहे. या विमानतळामुळे मुंबईचं नाव केवळ भारताच्या नव्हे, तर जगातील बहुविमानतळ प्रणाली असलेल्या प्रमुख शहरांमध्ये चमकणार आहे आणि हीच खरी उड्डाणाची सुरुवात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा