Navjot Singh Sidhu 
ताज्या बातम्या

Virat Kohli Wicket Controversy : 'नो बॉल' प्रकरण वादाच्या भोवऱ्यात? नवज्योतसिंग सिद्धू काय म्हणाले? व्हिडीओ एकदा पाहाच

कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीगच्या रंगतदार सामन्यात आरसीबीचा १ धावेनं पराभव केला. परंतु, केकेआर विरोधात झालेल्या या सामन्यात विराट कोहली बाद झाल्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं.

Published by : Naresh Shende

कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीगच्या रंगतदार सामन्यात आरसीबीचा १ धावेनं पराभव केला. परंतु, केकेआर विरोधात झालेल्या या सामन्यात विराट कोहली बाद झाल्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं. विराट कोहलीच्या नो बॉल वादावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. अशातच आता भारताचे माजी दिग्गज खेळाडू नवज्योत सिंग सिद्धू यांनीही विराट कोहली ज्या चेंडूवर बाद झाला, तो नो बॉल होता की नाही, यावर एका व्हिडीओच्या माध्यमातून मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

विराटने सलामीला येत केकेआरच्या गोलंदाजांचा सुरुवातीलाच धुव्वा उडवला होता. हर्षित राणा आणि मिचेल स्टार्कला षटकार ठोकून विराटने आरसीबीला जबरदस्त सुरुवात करुन दिली होती. हर्षितच्या गोलंदाजीच्या तिसऱ्या चेंडूवर विराट झेलबाद झाला. परंतु, तो चेंडू उंचीच्या नियमानुसार अधिक उसळी घेणारा होता, असं विराटचं म्हणणं होतं. पण तिसऱ्या पंचांनी स्क्रीनवर चाचपणी केल्यानंतर विराटला बाद घोषित केलं. पंचांच्या या निर्णयावर विराट कोहलीनं आक्षेप घेतला आणि पंचांसोबत बाचाबाची केली.

इथे पाहा नवज्योतसिंग सिद्धू यांचा व्हिडीओ

विराट कोहली ज्या चेंडूवर बाद झाला, तो नो बॉल होता की नाही, याबाबत भारताचे माजी दिग्गज खेळाडी नवज्योतसिंग सिद्धूनं अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच सिद्धून नियम बदलण्याबाबतही भाष्य केलं आहे. सिद्धूने त्या चेंडूबाबत या व्हिडीओच्या माध्यमातून सविस्तरपणे माहिती दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा