अबू आझमी यांच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उग्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजप नेत्या नवनीत राणा यांनीदेखील याबद्दल भाष्य केले आहे. त्यांनी आता याबद्दल आता त्यांचे मत व्यक्त केले आहे. नवनीत राणा म्हणाल्या की, "अबू आजमी यांनी जे वक्तव्य केलं त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी व आमच्या सरकारने अबू आजमी यांना अधिवेशनातून बाहेर काढण्याचे काम केलं आहे".
पुढे त्या म्हणाल्या की, "सरकारला अजून एक विनंती आहे की ज्या पद्धतीने औरंगजेबाचे विचार आमच्या महाराष्ट्राला चालत नाही त्याच पद्धतीने संभाजीनगर मध्ये जे औरंगजेबची कबर आहे तेही लवकरात लवकर उखडून महाराष्ट्रातून बाहेर फेकली पाहिजे. जी लोकं अशी वक्तव्य करणारे आहे व ज्यांना या औरंगजेब बापावर प्रेम आहे, अशा लोकांना ही शीक भेटली पाहिजे, महाराष्ट्र मध्ये औरंगजेब चे नाही तर इथे छत्रपती शिवाजी महाराजांची विचार चालतात".