Admin
ताज्या बातम्या

हिंदू शेरनी, 14 दिवसांचा तुरुंगवास; नवनीत राणांचे होर्डिंग्स मुंबईत झळकले

महाविकास आघाडी सरकारच्या काळात नवनीत राणा आणि रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठनासाठी मोठं आंदोलन केलं होते.

Published by : Siddhi Naringrekar

महाविकास आघाडी सरकारच्या काळात नवनीत राणा आणि रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठनासाठी मोठं आंदोलन केलं होते. आता पुन्हा एकदा नवनीत आणि रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

आगामी हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ६ एप्रिल रोजी अमरावतीत सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे बॅनर लावण्यात आले आहे.

या बॅनरवर हनुमान चालीसा पठन करणार म्हणून खोट्या राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली १४ दिवसांचा तुरुंगवास भोगला, असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आलाय. हिंदुत्व हाच श्वास, धर्मरक्षणाची आस… असे सुद्धा या बॅनरवर लिहिण्यात आले आहे. या बॅनरमध्ये नवनीत राणा यांचा हिंदू शेरनी असा उल्लेख करण्यात आला असून भगवी शाल पांघरलेला फोटो देखिल आहे. तसेच अमरावतीत १११ फूट उंचीची हनुमानाची भव्य मूर्ती उभारली जाणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा