Navneet Rana MRI  Team Lokshahi
ताज्या बातम्या

राणांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; MRI रुममधील फोटो प्रकरणी गुन्हा दाखल

किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे यांनी या मुद्दयावरुन लीलावती रुग्णालयातील प्रशासनाला जाब विचारला होता.

Published by : Sudhir Kakde

मुंबई : मुंबईतील लीलावती रुग्णालयातील (Lilavati Hospital) एमआरआय स्कॅन रूममधील खासदार नवनीत राणा यांचा फोटो काढून टाकल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी (Bandra Police Station) एफआयआर नोंदवला आहे. रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एमआरआय रूममध्ये मोबाईल कसा आला याचा तपास मुंबई पोलीस करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा पठण केल्याची घोषणा केल्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या पतीला राजद्रोह आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर दोघंही एका आठवड्यापेक्षा जास्त काळ तुरुंगात होते. त्यानंतर सत्र न्यायालयाने त्यांची अटींसह जामिनावर सुटका केली.

राणा दाम्पत्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. राणा यांनी आज पुन्हा एकदा दिल्लीतून पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर वर टीका केली. ठाकरे सरकारने आमच्यावर हेतुपुरस्कर कारवाई केली असून, तुरुंगात देखील आपल्याला त्रास झाल्याचं राणा म्हणाल्या आहेत. तर आमच्यावर दाखल झालेला गुन्हा हा यापूर्वी इंग्रजांविरोधात लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांविरोधात दाखल होत असत असं म्हणत त्यांनी आपण असे गुन्हे दाखल केल्याने शांत बसणार नाही असं म्हटलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा