ताज्या बातम्या

'लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असतेच...' भाजप प्रवेशाबाबत नवनीत राणांचं सूचक विधान

अमरावती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी कोणाला मिळणार? नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करुन कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Published by : shweta walge

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहेत. यातच नवनीत राणा यांनी भाजप प्रवेशाबाबत सूचक विधान केलं आहे. 'लक्ष्मीच्या हाती कमळ असते त्यावर डाऊट ठेवू नका' असं त्या म्हणाल्या आहेत. त्या अमरावतीत बोलत होत्या.

त्या म्हणाल्या की, लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असतेच त्यावर कोणीही डाऊट घेऊ नये असं त्यांनी म्हटलं,तर भाजप प्रवेशावर योग्य वेळी योग्य निर्णय कळवण्यात येईल. आम्ही एनडीएमध्ये आहे. आमची चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झाली असून आम्ही जो निर्णय घेऊ आमच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस नेहमी राहतील असा दावा नवनीत राणा यांनी केला आहे.

दरम्यान, काल लोकसभेच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन १९ एप्रिलपासून देशात सात टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडेल, अशी माहिती दिली. महाराष्ट्रातही ५ टप्प्यांत मतदान होणार असून राज्यासाठी ही निवडणूत अत्यंत अटीतटीची राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष आता तयारीला लागले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप

Saamana Editorial : '...ते अर्थात ‘ठाकरे भाऊ' विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून नेमकं काय म्हटलंय?