Minister Nawab Malik is being questioned by the Directorate of Recovery (ED) 
ताज्या बातम्या

माजी मंत्री नवाब मलिक यांना आणखी एक धक्का; संपत्ती जप्त करण्याबाबत ईडीच्या हालचाली

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिकयांना ईडीने मोठा दणका दिला आहे

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना ईडीने मोठा धक्का दिला आहे. मलिक यांची संपत्ती जप्त करण्याबाबत ईडीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मलिकांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश  ईडीने दिले आहेत. त्यानुसार मुंबईतील तीन फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील 147 एकर जमिनीचाही यात समावेश आहे. पटेल यांच्यावर मुखत्यारपत्राचा गैरवापर केल्याचा आणि हसिना पारकरच्या सूचनेनुसार गोवाला मालमत्ता मलिक यांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकल्याचा आरोप आहे. 

मलिक न्यायालयीन कोठडीत असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हसीना पारकर, तिचा साथीदार सलीम पटेल, सरदार खान यांच्यामदतीने नवाब मलिक यांनी बॉम्बस्फोटातील दोषींसह कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंडमध्ये एका महिलेची तीन एकर जमीन बेकायदेशीरपणे हडप करण्याच्या गुन्हेगारी कटात भाग घेतल्याचा आरोप ईडीने केला आहे.

गँगस्टर दाऊद इब्राहिम याची दिवंगत बहीण हसिना पारकर हिच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने फेब्रुवारीमध्ये मलिक यांना अटक केली होती. त्यानंतर एप्रिलमध्ये ईडीने मलिक कुटुंबाची मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती. या मालमत्ता नवाब मलिक, त्यांचे कुटुंबीय, सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मलिक इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित आहेत. नवाब मलिक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तेच्या तात्पुरत्या जप्तीची पुष्टी न्यायनिर्णय प्राधिकरणाने नुकतीच केली आहे. त्यात गोवाला कंपाऊंडचा परिसर आणि कुर्ला पश्चिमेला तीन फ्लॅट्स, वांद्रे पश्चिमेला दोन फ्लॅट्स आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 147 एकर शेतजमिनीचा समावेश आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा