Nawab Malik Team Lokshahi
ताज्या बातम्या

"आर्यन खानला क्लीन चिट, आता समीर वानखेडेंवर..."; मलिकांच्या कार्यालयातून ट्विट

आर्यन खानला क्लीन चिट मिळाल्यानंतर नवाब मलिकांच्या कार्यालयाकडून एक ट्विट करण्यात आलं आहे.

Published by : Sudhir Kakde

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला आज मोठा दिलासा मिळाला आहे. कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज ( Drugs on Cordelia Cruise) पार्टीप्रकरणात आरोपांच्या भोवऱ्यात सापडलेला आर्यन खान (Aryan Khan) आता या प्रकरणातून मुक्त झाला आहे. नार्कोटीक्स कन्ट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीकडून आर्यनला क्लीनचीट देण्यात आली आहे. एनसीबीकडून (NCB) शुक्रवारी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. यामध्ये एनसीबीकडून आर्यनला (Aryan Khan) क्लीनचीट देण्यात आली. त्यानंतर आता यावर नवाब मलिकांच्या बाजुने देखील प्रतिक्रिया आली आहे.

आर्यन खानला क्लीन चिट मिळाल्यानंतर नवाब मलिकांच्या कार्यालयाकडून एक ट्विट करण्यात आलं आहे. या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "आता या प्रकरणात आता आर्यन खान आणि इतर 5 जणांना क्लीन चिट मिळाली आहे. NCB आता समीर वानखेडे यांच्या टीमवर आणि खाजगी सैन्यावर कारवाई करेल का? की गुन्हेगारांना संरक्षण देणार?" असे सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा