Gadchiroli Team Lokshahi
ताज्या बातम्या

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून नक्षलींनी गडचिरोलीत दोघांची दगडाने ठेचून केली हत्या

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या लोहखनिज प्रकल्पात कालच्या पहिल्या जाहीर कार्यक्रमानंतर नक्षली सक्रिय झाले आहेत.

Published by : Team Lokshahi

गडचिरोली प्रतिनिधी | व्येंकटेश दुडमवार : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या लोहखनिज प्रकल्पात कालच्या पहिल्या जाहीर कार्यक्रमानंतर नक्षली (Naxal) सक्रिय झाले आहेत. त्यानंत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नक्षल्यांनी दोघांची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हेडरी पोलीस उपविभागीय क्षेत्रात गट्टा पोलिस मदत केंद्रा अंतर्गत नक्षल्यांनी दोघांची हत्या केली आहे. क्रूर नक्षल्यांनी दोघांचंही डोकं दगडाने ठेचून त्यांची हत्या केली. पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीमधून ही माहिती समोर आली आहे. हत्या झालेल्या दोघांमधील एक ग्रामस्थ दलसू हिचामी याची झारेवाडा येथे पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तर हत्या झालेला दुसरा हा आत्मसमर्पण केलेला नक्षली नवीन नरोटे हा आहे. गोलगुट्टा येथे त्याची हत्या झाली.

सुरजागड लोहखनिज टेकड्यांवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर कार्यक्रमाला 12 तास उलटण्याआधीच नक्षल्यांनी आपला उपद्रव दाखविल्याने पोलिसप्रशासनात खळबळ निर्माण झाली आहे. नक्षलींचा शोध घेण्यासाठी अतिरीक्त कुमक मागवण्यात आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा