ताज्या बातम्या

Pune News : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन शहराध्यक्षांची निवड; NCP नं सोपवली सुनील टिंगरे, सुभाष जगतापांवर जबाबदारी

पुणे महानगरपालिकेच्या संभाव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

Published by : Team Lokshahi

पुणे महानगरपालिकेच्या संभाव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. शहराच्या विस्तार व लोकसंख्येचा विचार करून पक्षाने पुणे शहराला पूर्व आणि पश्चिम अशा दोन विभागांमध्ये विभागले असून, प्रत्येकीसाठी स्वतंत्र शहराध्यक्ष आणि दोन कार्याध्यक्षांची नियुक्ती केली आहे.

पूर्व पुणे विभागात कसबा, कॅन्टोन्मेंट, हडपसर आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, या भागासाठी आमदार सुनील टिंगरे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत रुपाली पाटील ठोंबरे आणि हाजी फिरोज शेख यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात संवेदनशीलता आणि तत्परता दाखवणाऱ्या रूपाली पाटील ठोंबरे यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवत मोठी जबाबदारी सोपवली आहे.

पश्चिम पुणे विभागात पर्वती, खडकवासला, कोथरूड आणि शिवाजीनगर हे चार मतदारसंघ येतात. या भागासाठी माजी नगरसेवक व सभागृह नेते सुभाष जगताप यांची शहराध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. यांच्यासोबत प्रदीप देशमुख (फेरनिवड) आणि अक्रूर कुदळे यांना कार्याध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे.

या नियुक्त्यांची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार चेतन तुपे यांनी केली. नियुक्तीपत्रे राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी वितरित केली असून, या नव्या नियुक्त्यांमुळे पक्ष संघटन बळकट होण्यास मदत होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Fake Crop Insurance : नांदेडमधील 'बोगस' पीक विमा घोटाळा उघड; बीडचे 9 एजंट, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावानेही विमा

Saamana Editorial : 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांनी...'; 'सामना'तून सरकारवर साधला निशाणा

Shubhanshu Shukla Axiom 4 : शुभांशु शुक्लानं ISS च्या कक्षेत पूर्ण केला एक आठवडा; सांगितलं पुढील कामाचं नियोजन