Admin
ताज्या बातम्या

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. भुजबळांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळत असून तातडीने त्यांना काल येवल्याहून नाशिकला उपचारासाठी हलवण्यात आले होते. छगन भुजबळ यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवले होते. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्यानंतर आज छगन भुजबळ यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

याची माहिती भुजबळ यांनी ट्विट करुन दिली आहे.  माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळून आल्यास आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा." असे त्यांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा