ताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्त होण्याची घोषणा केली. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली असून यावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही. यामुळे अनेक कार्यकर्ते भावूक झाले असून शरद पवारांना घोषणा मागे घेण्याचे मागणी करत आहेत.

यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अनेक पदाधिकाऱ्यांसह राजीनामा दिला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, शरद पवार हे राजकारणातील भिष्मपितामह आहेत. अजित पवार यांचा सुर काय आहे माहीत नाही आमचा सुर स्पष्ट आहे. सुप्रिया सुळे राष्ट्रीय स्तरावर. अजित पवार राज्य स्तरावर या वर बोलताना जरतर ला अर्थ नसतो.

तसेच ते म्हणाले की, आपण लोक जी भूमिका घेतात त्या सोबत राहील पाहिजे असा आग्रह शरद पवार यांचा असतो. शेवटी शरद पवार जे म्हणतील ते अंतिम असेल, पण आम्हाला विश्वासात न घेता त्यांना तडकाफडकी राजीनामा देण्याचा अधिकार नाही. आमचा ही तोच आग्रह आहे. शरद पवार यांनी राजीनामा देऊ नये. असे आव्हाड म्हणाले.

गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी; अमोल कोल्हे म्हणाले...

गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी; संजय राऊत म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात सभा; संजय मंडलिक म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात जाहीर सभा; धैर्यशील माने यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Balya Mama Mhatre : या देशात एक परिवर्तनाची लाट तयार झालेली आहे