Vidya Chavan, Nitesh Rane Team Lokshahi
ताज्या बातम्या

“दीड फुटाच्या आमदाराची जीभ…” नितेश राणेंवर विद्या चव्हाणांची जोरदार टीका

आंदोलनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत राज्यपासून केंद्रापर्यंतच्या सर्व भाजप नेत्यांवर हल्लाबोल करीत महागाई आणि बेरोजगारी वरील लक्ष हटवण्यासाठी अनावश्यक विषय घेत असल्याचा आरोप केला.

Published by : shweta walge

राष्ट्रवादी काँग्रेस महिला सेलचे जनजागर आंदोलन सुरू असून आज नवी मुंबईत पार पडले. या आंदोलनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत राज्यपासून केंद्रापर्यंतच्या सर्व भाजप नेत्यांवर हल्लाबोल करीत महागाई आणि बेरोजगारी वरील लक्ष हटवण्यासाठी अनावश्यक विषय घेत असल्याचा आरोप केला. तसेच दीड फुटाचा आमदार तीन फुटांची जीभ असल्यासारखं बोलतो. अजित पवारांवर बोलण्याआधी तुम्ही कोण आहात, याचा विचार करा, अशी टीका विद्या चव्हाण यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

त्या म्हणाल्या की, तुम्ही ‘कामाख्या देवीकडे जाऊन जादू टोणा करून सत्ता आणली पण ती टिकणार नाही. आमच्याकडे साडेतीन शक्तीपीठं आहेत. तुम्ही कामाख्या देवीला जाता, कारण तिकडे जादूटोणा चालतो म्हणून,’ असे विद्या चव्हाण म्हणाल्या आहेत.

दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाहीत तर स्वराज्य रक्षक आहेत,असं वक्तव्य अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये केले होते. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली. त्यांनी राज्यात ठिकठिकाणी याबाबत आंदोलने केली. यावेळी आमदार नितेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख धरणवीर असा केला. त्यांच्या या टीकेला अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तरसुद्धा दिले होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा