Jitendra Awhad  Lokshahi
ताज्या बातम्या

"गाडीवर दगड मारला म्हणून मी त्यांच्याविरोधात बोलणार नाही, असं त्यांना वाटत असेल, पण आता मी..."; जितेंद्र आव्हाडांचा पलटवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यावर सडकून टीका केली होती.

Published by : Naresh Shende

Jitendra Awhad Press Conference : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यावर सडकून टीका केली होती. छत्रपती संभाजी महाराज यांचं रक्त हिरवं आहे का? असा सवाल उपस्थित करत आव्हाडांनी संभाजीराजेंना डिवचलं होतं. आव्हाडांच्या या विधानाचा समाचार घेत संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या गाडीवर हल्ला केला. पोलीस सुरक्षा असतानाही हा हल्ला झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

त्यांना वाटत असेल गाडीवर दगड मारला म्हणून मी त्यांच्याविरोधात बोलणार नाही. आता मी आणखी द्वेषाने आणि तीव्रतेनं बोलेल. मी आजपर्यंत आदराने बोलायचो. तुम्ही विचारांमध्ये चुकला आहात. तुम्ही शाहू महाराजांचे विचार सोडले. आम्ही त्यांचे विचार सोडले नाहीत. तुम्ही रक्ताचे वारसदार आहात. आम्ही वैचारिक वारसदार आहोत. स्वत:च्या वडिलांनी तुमचा निषेध केला. तुमच्या मनात आग आहे. तुमचे वडील खासदार झाले म्हणून जळतंय तुम्हाला. तुम्हाला खासदारकीचं तिकिट हवं होतं. तुम्ही सर्व पक्षांच्या दरवाज्यात जाऊन आले. त्यांनी तुम्हाला तिकिट न दिल्यानं तुम्हाला आग लागली आहे. त्याच्यातून तुम्ही बेताल वक्तव्य करत आहात आणि तसे वागत आहात.

हा हल्ला म्हणजे शरद पवार गटावर झालेला हल्ला आहे, यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, माझ्यावर हल्ला म्हणजे राष्ट्रवादीवर हल्ला आहे, असं मला काहीही वाटत नाही. हा हल्ला माझ्यावरच आहे. मी पक्षावर ढकलत नसतो. मी बोललो होतो, इतर कुणी बोललं नव्हतं. मी आजही बोलतो, छत्रपती शिवाजी राजांचे वारसदार राजश्री शाहू यांच्या विचारांशी संभाजीराजे यांनी गद्दारी केली.

चार ते पाच लोकांनी हातात लाठ्या काठ्या घेऊन हल्ला केला, यावर बोलताना आव्हाड म्हणाले, गाडीवर दगड पडल्याचं मला समजलं. पुढे जाऊन मी गाडी थांबवली, पण ते उलटे पळून गेले. सरकार कुठंतरी कायदा सुव्यवस्था बघत नाही का? या प्रश्नाचं उत्तर देताना आव्हाड म्हणाले, मी पोलिसांना विचारलं की तुम्ही गाडीतून उतरले का नाहीत? पोलीस म्हणाले, तुमच्या सुरक्षिततेचा प्रश्न होता. नाहीतर आम्ही फायरिंग करु शकलो असतो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा