ताज्या बातम्या

रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवड

Published by : Siddhi Naringrekar

रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचा माजी कर्णधार शंतनु सुगवेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. मात्र यातून रोहीत पवार यांची निवड झाली आहे. गेली दोन वर्षे अधिकृत घटनेच्या वादात अडकलेल्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवडणूकीत बाजी मारण्यासाठी रोहित पवार यांना पुढे करण्याचा निर्णय चांगलाच यशस्वी ठरला.

रोहित पवार आणि शरद पवारांचे भाचे जावई विक्रम बोके यांचा मुलगा अभिषेक हे यावेळी एकमेकांविरुद्ध उभे होते. मात्र, अभिषेक बोके या निवडणूकीत त्यांना बाजी मारता आली नाही. या निवडणुकीसाठी कार्यकाल संपलेल्या पदाधिकाऱ्यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार लांब राहावे लागणार होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दोन नातवांमध्ये महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती. यामध्ये रोहित पवार यांनी पहिल्याच प्रयत्नात बाजी मारली.

IPL 2024 : मुंबई इंडियन्सविरोधात मॅकगर्क-स्टब्सचा झंझावात! शेवटच्या चेंडूवर दिल्लीनं जिंकला रंगतदार सामना

भाजपने मुंबई उत्तर-मध्य लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "राजकारणातून..."

कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यातून PM मोदींचा 'मातोश्री'वर निशाणा; म्हणाले, आज बाळासाहेब असते, तर..."

उद्गीरमध्ये प्रियांका गांधींचा PM मोदींवर हल्लाबोल, म्हणाल्या; "पैशांच्या जोरावर महाराष्ट्रातील आमदारांना..."

Onion Export: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; केंद्राकडून कांदा निर्यातीला अखेर परवानगी