भारतीय जनता पार्टी ही पाहिल्यांदाच सत्तेत आली होती. त्यावेळी देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांचे सारकार केवळ एका मताने पडले. त्यावेळचा किस्सा शरद पवार यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितला आहे.
नीलेश कुमार कुलकर्णी यांच्या 'संसद भवन ते सेंट्रल विस्टा: आठवणींचा कर्तव्यपथ' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता. यावेळी शरद पवार बोलत होते. शरद पवार म्हणाले की, "माझ्या कारकीर्दीबाबत खूप कमी लोकांना माहिती आहे. मी संसदेत विरोधी पक्षनेता होतो. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयीचं सरकार होतं. विरोधी पक्षात असताना आम्ही अटल बिहारी वाजपेयी यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मांडला आणि तो ठराव एक मताने मंजूर झाला असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, "ते जे एक मत होते ते मी मिळवलं होतं. पण ते कसं ही मी सांगत नाही. ठराव मांडला, चर्चा झाली आणि मधल्या वेळेत मी बाहेर गेलो कोणाशीतरीही आणि परत येऊन बसलो. सत्ताधाऱ्यांमधील एका व्यक्तीने काहीतरी निर्णय घेतला आणि एका मताने ते सरकार पडले. त्यावेळी पक्षनेते पदाची जबाबदारी माझ्याकडे होती".