गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवार आणि अजित पवार (sharad pawar - ajit pawar ) यांच्यातील भेटीगाठी बैठका आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. तसेच यामुळे शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगलेल्या पाहायला मिळत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar - Supriya Sule ) काल एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमात अजित पवार आणि सुप्रिया सुळे समोरासमोर आले. यावेळी दादा-ताईंमध्ये पहिल्यांदाच हास्यविनोद झालेला पाहायला मिळाला.
या दरम्यान दोघांमध्ये काही क्षण संवाद देखील झाला. या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून या भेटीच्या वेळी दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित होते.