ताज्या बातम्या

Suraj Chavan on Mahendra Dalvi : "आमच्या नादाला लागू नका नाहीतर..." दादांच्या राष्ट्रवादीवर टीका करणाऱ्या शिंदेंच्या आमदाराला राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा इशारा

पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणावर बोलताना महेंद्र दळवी यांनी अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर टीका केली. महेंद्र दळवी यांनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Published by : Prachi Nate

रोहा तालुक्यातील जनतेसाठी विकासाचा नवा अध्याय उघडणारा शिवसेना पक्ष प्रवेश सोहळा आज उत्साहात पार पडला. यावेळी पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणावर बोलताना अलिबागचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी गंभीर गौप्यस्फोट केला. निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण कसे बाहेर आले असा सवाल करताना राष्ट्रवादीच्याच लोकांनी त्यांचा घात केला असा संशय महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला. यावेळी दळवी यांनी अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर टीका केली.

याचपार्श्वभूमिवर महेंद्र दळवी यांनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रवक्ते सुरज चव्हाण म्हणाले की, "अजित पवारांवरती टीका करण्याऐवजी स्वतःच्या पक्षात झाकून बघितलं असतं तर अनेक महापुरुष अनेक महामानव यांचे कार्य प्रणाली दिसून आले असते. यामध्ये संदिपान भुमरे यांचा ड्रायव्हरच्या नावावर सुरू आहे काय सापडलं हे सर्वांना माहीत आहे".

"संजय शिरसाठ यांचा काय चालू आहे संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. योगेश कदम आहेत दीपक केसरकर आहेत अनेक महामानव आहेत त्यांची कार्यपद्धती महाराष्ट्र बघत आहे. त्यामुळे महेंद्र दळवींनी आपलं ठेवायचा झाकून आणि दुसऱ्यांचा बघायचा वाकून हे बंद कराव नंतर काही गोष्टी पर्दे मे रहने दो तो ही अच्छी रहती है. नाहीतर आमच्या नादाला लागला तर सर्व उघडे पाडू".

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा