ताज्या बातम्या

UPSC Exam : तरुणांसाठी मोठी बातमी! NDA आणि INAC प्रवेशासाठी 406 जागा ; परीक्षेची तारीखही जाहीर

UPSC परीक्षा: NDA आणि INA मध्ये 406 जागांसाठी सुवर्णसंधी

Published by : Team Lokshahi

युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) मार्फत नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी (NDA) व इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी (INA) मध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी दुसरी संयुक्त परीक्षा 14 सप्टेंबर 2025 रोजी पार पडणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण 1 जुलै 2026 पासून सुरू होईल.

या परीक्षेमार्फत एकूण 406 जागांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये NDA अंतर्गत 37 जागा, तर INA अंतर्गत 36 जागांचा समावेश आहे.

जागा विभागणी:

नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी (370 पदे)

आर्मी विंग: 208 जागा (यामध्ये महिलांसाठी 10 जागा)

नेव्हल विंग: 42 जागा (महिलांसाठी 5 जागा)

एअरफोर्स विंग:

फ्लाइंग ब्रँच: 92 जागा (महिलांसाठी 2)

ग्राउंड ड्युटी (टेक्निकल): 18 जागा (महिलांसाठी 2)

ग्राउंड ड्युटी (नॉन-टेक्निकल): 10 जागा (महिलांसाठी 2)

इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी (INA) – 36 पदे (10+2 कॅडेट एंट्री स्कीम):

महिलांसाठी राखीव: 4 जागा

पात्रता निकष:

NDA आर्मी विंगसाठी: कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण.

NDA नेव्हल व एअरफोर्स विंगसाठी आणि INA साठी: बारावी (गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र) विषयांसह उत्तीर्ण.

प्रशिक्षणाची माहिती:

NDA मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पुण्यातील NDA अकॅडमीत ३ वर्षांचे प्रशिक्षण दिले जाईल.

INA साठी पात्र उमेदवारांचे इझिमाला (केरळ) येथील अकॅडमीत ४ वर्षांचे प्रशिक्षण होईल.

प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यावर उमेदवारांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाकडून संबंधित शैक्षणिक पदवी प्रदान केली जाईल:

आर्मी – B.A./B.Sc./B.Sc. (Computer Science)

नेव्ही – B.Tech

एअरफोर्स – B.Tech/B.Sc./B.Sc. (Computer Science)

परीक्षा केंद्रे:

मुंबई, पुणे, नागपूर, नवी मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, पणजी इत्यादी शहरांमध्ये परीक्षा होणार आहे.

अर्ज प्रक्रिया:

उमेदवारांनी 17 जून 2025, रात्री 11:59 वाजेपर्यंत www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा.

अधिक माहितीसाठी संपर्क:

UPSC सुविधा केंद्र दूरध्वनी: 011-24041001 (कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते संध्या 5.30 पर्यंत)

ई-मेल: upscsoap@nic.in

इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा (www.upsconline.nic.in) पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि इतर सर्व अटी व शर्ती याबाबत तपशील UPSC च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद