ताज्या बातम्या

President Election 2022 : द्रौपदी मुर्मू आज मुंबईत; पाठिंबा देऊनही उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही

भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज (14 जुलै ) मुंबईत येत आहेत.

Published by : Shweta Chavan-Zagade

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने (Shiv Sena) भाजप प्रणीत एनडीएच्या (NDA) उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा दिला आहे. याचदरम्यान भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज (14 जुलै ) मुंबईत येत आहेत. भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट व अपक्ष आमदार आणि खासदार यांना मूर्मू यांच्याबरोबर होणाऱ्या बैठक व चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुर्मू यांना मंगळवारी पाठिंबा जाहीर केला असला तरी त्यांना किंवा शिवसेनेला या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलेले नाही.

द्रौपदी मुर्मू या गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास मुंबईत येत असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भारती पवार आणि अन्य नेते त्यांच्यासमवेत असतील. भाजप, शिंदे गट व अपक्ष आमदार- खासदारांबरोबर मुर्मू यांची बैठक विमानतळाजवळील पंचतारांकित लीला हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या वेळी मुर्मू या लोकप्रतिनिधींशी संवाद साधणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप व शिंदे गटातील नेते या वेळी उपस्थित राहणार आहेत.

खासदारांच्या दबावामुळे उद्धव ठाकरे यांनी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी त्यांना किंवा शिवसेनेच्या आमदार- खासदारांना या बैठकीचे आमंत्रण देण्यात आलेले नाही. शिंदे गटाला आमंत्रित करण्यात आले असून एनडीएच्या बैठकीत प्रवक्ते दीपक केसरकर हे सहभागी झाले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा