ताज्या बातम्या

Bihar Election 2025 : एनडीएच्या जागा वाटपाचा फार्म्युला फायनल

बिहार विधानसभेची निवडणूक (Bihar Election 2025) जाहीर झाल्यानंतर आता एनडीएमधील (NDA) जागा वाटप फायनल झाले आहे. एनडीएमधील अनेक छोट्या पक्षांना जागा देण्यात आल्या आहेत.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • बिहार विधानसभेची निवडणूक भाजप शंभर जागांवर लढणार ?

  • कोणी किती जागा मागितल्या होत्या

  • एमआयएम इंडिया आघाडीचा खेळ बिघडविणार ?

बिहार विधानसभेची निवडणूक (Bihar Election 2025) जाहीर झाल्यानंतर आता एनडीएमधील (NDA) जागा वाटप फायनल झाले आहे. एनडीएमधील अनेक छोट्या पक्षांना जागा देण्यात आल्या आहेत. ज्या जागांवरून रस्सीखेच होत्या, त्या जागांचा प्रश्न मिटला आहे. बिहारमध्ये जागा वाटपात मोठ्या भावाचा मान हा मुख्यमंत्री नितीशकुमार (NitishKumar) यांच्या जनता दल युनायटेड (JDU) या पक्षाला मिळणार आहे. तर त्या खालोखाल भाजपला (BJP) जागा असणार आहे. तर तिसऱ्या क्रमाकांच्या जागा केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) यांच्या पक्षाला देण्यात आल्या आहे. एक-दोन दिवसात जागा वाटप अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले जाणार आहे.

जागा वाटपाचा फार्म्युल्यानुसार नितीशकुमार यांच्या पक्षाला 101 जागा दिल्या जाणार आहे. तर भाजपला 100, लोक जनशक्ती पार्टीला 29 जागा, जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चा (HAM)ला सात, तर राष्ट्रीय लोक मोर्चाला सहा जागा मिळणार आहेत. मागील निवडणुकीत जेडीयूने 115 जागा लढत 43 जागा जिंकल्या होत्या. तब्बल 72 जागांवर पराभव पत्करावा लागला होता. आता एनडीएमध्ये जास्त पक्ष असल्याने जेडीयू कमी जागा लढणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत ते चौदा जागा कमी लढणार आहेत. त्यांच्या वाटेच्या चौदा जागा हे त्यांच्या साथीदार पक्षांना देत आहेत.

भाजप शंभर जागांवर लढणार ?

भाजप पक्ष शंभर जागांवर लढणार आहे. लोकसभा निवडणूक आणि गेल्या विधानसभेत बिहारमध्ये भाजपमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. परंतु केंद्रात भाजपला जदयूची गरज आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या भावाचा मान नितीशकुमारांना दिला आहे. तर भाजप हा छोटा भावाच्या भूमिकेत असणार आहे. गेल्यावेळी भाजपचे 78 आमदार निवडून आले होते. तेव्हा भाजप 110 जागांवर लढली होती. आता दहा जागा छोट्या पक्षांना भाजपने सोडल्या आहेत. त्यामुळे भाजप शंभर जागांवरच लढू शकते.

कोणी किती जागा मागितल्या होत्या

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी 43 ते 137 जागांची मागणी केली होती. अन्यथा स्वंतत्र्य लढू असा इशारा दिला होता. हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी 25 जागांची मागणी केली होती. परंतु शेवटी सात जागांवर त्यांचे समाधान झाल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय लोक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी आठ ते दहा जागांची मागणी केली होती. त्यांना सहा जागा सोडण्यात आल्या आहेत.

लोकसभेत कुणाचे किती खासदार ?

केंद्रात भाजपचा सरकार हे जेडीयूच्या टेकूवर आहे. त्यामुळे भाजपकडून नितीशकुमारांचा मान ठेवला जातोय. लोकसभेला नितीशकुमारांच्या जेडीयूचे 17 खासदार निवडून आले. तर भाजपला 16 जागा मिळाल्या होत्या. पासवान यांच्या पक्षाने पाच जागा निवडून आणल्या आहेत. त्यामुळे पासवान यांच्या पक्षाला 29 जागा सोडण्यात आल्या आहेत. त्याचा धर्तीवर जागा वाटप झाल्याचे बोलले जात आहे.

एमआयएम इंडिया आघाडीचा खेळ बिघडविणार ?

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएमची जोरदार तयारी आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी तिसऱ्या आघाडी तयार करण्याबाबत विचार सुरू केला आहे. त्यात एमआयएम शंभर जागा लढणार असल्याचे ओवैसी यांनी जाहीर केलंय. त्यामुळे ओवैसी हे बिहारमध्ये इंडिया आघाडीचा खेळ बिघडविणार असे दिसत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा