Uddhav Thackeray, Neelam Gorhe, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Neelam Gorhe, Eknath Shinde Team Lokshahi
ताज्या बातम्या

नीलम गोऱ्हेंचा शिंदे गटात प्रवेश; ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

Published by : shweta walge

पावसाळी अधिवेशनापुर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विधान परीषद उपसभापती आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गोऱ्हेंनी प्रवेश केला आहे. निलम गोऱ्हे यांच्या पक्षप्रेवेशावर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी निलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

आमदार अनिल परब म्हणाले की, शिवसैनिकांच्या मेहनीतवर नीलम गोऱ्हे यांनी चार वेळा आमदारकी उपभोगली. याबद्दल त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. परंतु ज्या शिवसैनिकांच्या जोरावर त्यांनी ही सगळी पदे उपभोगली, त्या शिवसैनिकांना हे पाहून किती यातना होत असतील, याचा विचार करावा.

पुढे ते म्हणाले, आपल्याला काही मिळत नाही, म्हणून पक्ष सोडणारे भरपूर आहेत, असं असलं तरी पक्षाच्या वाईट दिवसात लाखो कार्यकर्ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबर आहेत. त्यामुळे असे संधीसाधू लोक गेले असतील, तर त्यांची जागा आम्ही नक्कीच भरून काढू. त्याची काळजी आम्ही करत नाही. परंतु दुःखाची गोष्ट ही आहे की, अशी सगळी पदं उपभोगल्यानंतर पक्षाला दगा देणं आणि वार करणं हे उच्च पदस्थ पदाधिकाऱ्यांना शोभत नाही.

नीलम गोऱ्हे आता शिंदे गटात गेल्या आहेत. त्यावर मी इतकंच सांगेन की, त्यांना जी काही आश्वासनं मिळाली असतील किमान ती पूर्ण व्हावीत, एवढीच आमची अपेक्षा आहे. ना इकडच्या ना तिकडच्या अशी त्यांची अवस्था होऊ नये.

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा

मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

World Hypertension Day 2024 : 'जागतिक उच्च रक्तदाब दिवस' कधी आणि का साजरा केला जातो?

"४ तारखेनंतर टरबूजचा भाव उतरणार आहे"; उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका

Daily Horoscope 17 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना साडेसातीचाही होणार त्रास; पाहा तुमचे भविष्य