ताज्या बातम्या

Lokshahi Pune Sanwad 2025 : Neelam Gorhe : "उद्धवजी ठाकरे यांच्याकडे सूत्र होती पण....., बाळासाहेबांनी मला " उपनेत्या" केलं"

'लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे आयोजित 'पुणे संवाद 2025' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

'लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे आयोजित 'पुणे संवाद 2025' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'पुणे संवाद 2025' या कार्यक्रमात महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दलही चर्चा झाली. या कार्यक्रमात नीलम गोऱ्हे यांच्यासोबत संवाद साधण्यात आला. यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, "राजकारणात बरेच चढउतार मी पाहिलं. हा समाज जातीयतेपासून दूर व्हावा स्त्री पुरुष विषमतेपासून दूर व्हावा. भारत्या राज्यघटनेनुसार लोकशाहीमध्ये प्रत्येकाला संधी मिळाली. ती संधी मिळाल्यानंतर कोणी हिसकावून घेऊ नये, या मुद्द्यावरती मी ठाम आहे."

"1998 सालानंतर ज्या वेळेला मी शिवसेनेमध्ये काम करायला लागले त्यावेळेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावरती 2002मध्ये विधानपरिषदेची आमदार म्हणून जबाबदारी टाकली. त्यावेळी स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते की, मी विधानपरिषदेची उपसभापती होईन. त्यानंतर पक्षाने 2008मध्ये संधी दिली, 2014मध्ये संधी दिली. कोणीही पक्षामध्ये कुठल्याही व्यक्तीला ते युनिक असं काम, वेगळं असं काम करत असल्याशिवाय कुठलाही पक्ष असा संधी देत नसतो."

" पहिली पक्षामधली उपनेता 2005मध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलं, अर्थात त्यावेळेला उद्धवजी ठाकरे यांच्याकडे सुत्रे होती. पुढच्या काळामध्ये बरेचसं पाणी पुलाखालून वाहून गेलं. नंतर फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब त्यांनी सांगितले मला, निलमताई तुम्ही खात्री बाळगा तुमच्या कुठल्याही काळात हस्तक्षेप होणार नाही. तुम्ही स्वंतंत्रपणे काय योग्य वाटतं ते करा. तसेच एक दोन भूखंड माफियांना माझ्यामुळे तुरुंगात जावं लागले. त्याच्यामुळे पक्षाला असं वाटलं की, या कुठल्याही दबावाला बळी पडणार नाहीत. त्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला या सगळ्या पार्श्वभूमीवर मी पहिली महिला उपसभापती झाले." असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा