ताज्या बातम्या

Netflix Shorts Video Feature : नेटफ्लिक्सवर आता दाखवता येईल तुमचं टॅलेंट; युजर्ससाठी येतयं 'शॉर्ट व्हिडिओ' फिचर

नेटफ्लिक्स आता केवळ वेब सिरीज आणि सिनेमांसाठीच नव्हे, तर शॉर्ट व्हिडिओंसाठीही ओळखलं जाणार आहे.

Published by : Team Lokshahi

नेटफ्लिक्स आता केवळ वेब सिरीज आणि सिनेमांसाठीच नव्हे, तर शॉर्ट व्हिडिओंसाठीही ओळखलं जाणार आहे. Instagram Reels आणि YouTube Shorts यांच्याशी थेट स्पर्धा करण्यासाठी नेटफ्लिक्स आपल्या मोबाईल अ‍ॅपमध्ये नवीन 'शॉर्ट व्हिडिओ' फीचर आणत आहे. लवकरच युजर्सना त्यांच्या आवडीच्या व्हिडिओंचा जल्लोष याच अ‍ॅपमध्ये पाहायला मिळणार आहे.

काय आहे नेटफ्लिक्सचं नवीन वैशिष्ट्य?

या नव्या फीचरमध्ये युजर्सना व्हर्टिकल फॉरमॅटमध्ये शॉर्ट व्हिडिओज पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे, हे व्हिडिओ युजरच्या पसंतीनुसार वैयक्तिकरित्या सजेस्ट करण्यात येणार आहेत. म्हणजेच, तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहत असलेल्या फिल्म्स किंवा सिरीजच्या आधारे तुमच्या आवडीचा कंटेंट या शॉर्ट व्हिडिओ सेक्शनमध्ये दिसेल. या विभागाचं नाव नेटफ्लिक्सने ‘Today’s Top Picks for You’ असं दिलं आहे.

याशिवाय, हे व्हिडिओ सोप्या पद्धतीने शेअर करता येणार आहेत. स्वाइप करत पुढचा व्हिडिओ बघता येईल, तर आवडलेला व्हिडिओ सेव्ह करून मित्रमैत्रिणींना पाठवण्याची सुविधाही दिली जाईल.

शॉर्ट व्हिडिओ कंटेंटची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. अनेकदा युजर्स मोठ्या सिनेमांपासून थोडा ब्रेक घेण्यासाठी Instagram किंवा YouTube कडे वळतात. अशावेळी युजर्सला अ‍ॅपमध्येच गुंतवून ठेवण्यासाठी आणि त्यांचा वेळ वाढवण्यासाठी नेटफ्लिक्सने हे नवे वैशिष्ट्य तयार केले आहे. शिवाय, मनोरंजन क्षेत्रातील वाढती स्पर्धा लक्षात घेता, नव्या पद्धतीने युजर्सचं लक्ष वेधणं ही नेटफ्लिक्सची गरज बनली आहे.

सध्या हे फीचर अमेरिकेतील काही निवडक युजर्ससोबत चाचणी स्वरूपात सुरू आहे. लवकरच अमेरिकेत सर्वांसाठी हे उपलब्ध होईल. मात्र भारतात यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. अद्याप नेटफ्लिक्सने भारतातील लाँचिंगबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

जर नेटफ्लिक्सने या फीचरला प्रभावीपणे सादर केलं, तर हे त्यांच्यासाठी एक गेमचेंजर ठरू शकतं, असं तज्ज्ञांचं मत आहे. यामुळे युजर्स अ‍ॅपमध्ये अधिक वेळ घालवतील आणि नेटफ्लिक्सची मोबाईल युजर्समधील उपस्थिती अधिक बळकट होईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा