मोठी बातमी : मुंबई विमानतळावर नेटवर्क प्रणाली कोलमडली; प्रवाशांचे हाल, सेवा ठप्प मोठी बातमी : मुंबई विमानतळावर नेटवर्क प्रणाली कोलमडली; प्रवाशांचे हाल, सेवा ठप्प
ताज्या बातम्या

मोठी बातमी : मुंबई विमानतळावर नेटवर्क प्रणाली कोलमडली; प्रवाशांचे हाल, सेवा ठप्प

छत्रपती शिवाजी विमानतळावर तांत्रिक बिघाड; प्रवाशांना मनस्ताप, उड्डाणे विलंबित.

Published by : Riddhi Vanne

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी अचानक नेटवर्क प्रणाली ठप्प झाल्याने मोठा गोंधळ उडाला. या तांत्रिक बिघाडामुळे चेक-इन आणि बोर्डिंग प्रक्रिया 'मॅन्युअल मोड'वर वळवावी लागली असून, त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. पावसाळ्यामुळे आधीच मुंबईतील वाहतूक आणि रेल्वे सेवा विस्कळीत असताना, आता विमानतळावरही या तांत्रिक अडथळ्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अचानक सर्व्हर डाऊन झाल्याने इंडिगो, एअर इंडिया, अकासा, विस्तारा यांसारख्या मोठ्या खासगी विमान कंपन्यांना देखील आर्थिक आणि व्यवस्थापकीय फटका बसला आहे. अनेक उड्डाणे विलंबाने होत असून, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.

आयटी विभागाकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे प्रयत्न

विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व्हर डाऊन झाल्यामुळे चेक-इन, बोर्डिंग आणि सामान तपासणी यांसारख्या सर्व प्रक्रिया मॅन्युअलपणे राबवाव्या लागत आहेत. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर मोठ्या प्रमाणावर वेळ लागत आहे. आयटी आणि कोअर टीमकडून तांत्रिक बिघाड शोधण्याचे आणि तो दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व संबंधित विभागांना Standard Operating Procedure (SOP) नुसार 'कंटिजन्सी प्लॅन' राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तांत्रिक बिघाडाचे कारण अद्याप गुलदस्त्यात

सर्व्हर ठप्प होण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रशासनाने सांगितले की विमानतळावरील यंत्रणा सुरळीत सुरू असतानाच अचानक नेटवर्क फेल्युअरची समस्या उद्भवली. तांत्रिक टीम ही अडचण ओळखून लवकरात लवकर सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, प्रवाशांनी त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

प्रवाशांच्या संयमाची कसोटी

या तांत्रिक अडचणीमुळे प्रवाशांना तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत आहे. काही प्रवाशांचे व्यावसायिक व आंतरराष्ट्रीय दौरे विलंबित झाले असून, काही फ्लाइट्स रद्द होण्याच्या स्थितीत आहेत. या गोंधळामुळे प्रवाशांमध्ये अस्वस्थता पसरली असून, प्रशासनाकडून सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

ही घटना मुंबईसारख्या महानगरातील अत्याधुनिक सुविधांवर अवलंबून असलेल्या व्यवस्थापनासाठी एक गंभीर इशारा मानली जात आहे. अशा तांत्रिक बिघाडांमुळे नेटवर्क आणि आयटी सिस्टम्सच्या विश्वसनीयतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Prakash Ambedkar On Sharad Pawar : "शरद पवारांचा दावा हा ‘वरातीमागून घोडे’; मंडल यात्रेवरूनही प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल"

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची लगबग

Rakshabandhan 2025 : राखीच्या सणानंतर एकच प्रश्न; राखी कधी काढायची?

Varanasi Temple Fire News : वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; 9 जण होरपळले, 4 जणांची प्रकृती गंभीर