admin
ताज्या बातम्या

नवीन ऑडी क्यू ३ च्या बुकींगला सुरुवात

नवीन ऑडी क्यू३ प्रिमिअम प्लस व टेक्नोलॉजी या दोन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असेल आणि सेगमेंट-फर्स्ट असलेल्या अनेक वैशिष्ट्यांसह येईल.

Published by : Team Lokshahi

ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतात ऑडी इंडिया वेबसाइट व ‘मायऑडी कनेक्ट’ अॅपवर नवीन ऑडी क्यू३ साठी ऑनलाइन बुकिंला सुरूवात केली. नवीन ऑडी क्यू३ प्रिमिअम प्लस व टेक्नोलॉजी या दोन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असेल आणि सेगमेंट-फर्स्ट असलेल्या अनेक वैशिष्ट्यांसह येईल.

नवीन ऑडी क्यू३ २,००,००० रूपये या सुरूवातीच्या रक्कमेसह बुक करता येऊ शकते. पहिल्या ५०० ग्राहकांना एक्सटेण्डेड वॉरंटी व कम्प्रेहेन्सिव्ह सर्विस पॅकेजसह आकर्षक मालकीहक्क लाभ मिळतील ज्यात २+३ वर्षांची एक्सटेण्डेड वॉरंटी, ३ वर्षे / ५०,००० किमी कम्प्रेहेन्सिव्ह सर्विस व्हॅल्यू पॅकेज, विद्यमान ऑडी ग्राहकांसाठी स्पेशल लॉयल्टी लाभ यांचा समावेश आहे.

बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, नवीन ऑडी क्यू३ चे भारतात फॅन फॉलोअर्स आहेत आणि सर्वांच्या आवडीची आहे. हे आमचे सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल राहिले आहे आणि आम्हाला सर्व आकर्षक वैशिष्ट्ये व मालकीहक्क लाभांच्या घोषणेसोबत बुकिंग्जना सुरूवात करण्‍याचा आनंद होत आहे. नवीन ऑडी क्यू३ सह आम्ही या वेईकलचे नवीन लुक व दर्जात्मक वैशिष्ट्यांसह सर्वोत्तम तत्त्व सादर करत आहोत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा