ताज्या बातम्या

पुणे रेल्वे स्थानकावर सामान्य प्रवाशांसाठी नवी सुविधा; गर्दी नियंत्रणासाठी होल्डिंग झोन

पुणे रेल्वे स्थानकाने सामान्य श्रेणीतील प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन 'होल्डिंग एरिया' सुरू केला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

पुणे रेल्वे स्थानकाने सामान्य श्रेणीतील प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन 'होल्डिंग एरिया' सुरू केला आहे. हे पाऊल प्रवाशांची वाढती गर्दी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, मोठ्या वर्दळीच्या स्थानकांवर अशा प्रकारच्या सुविधा असणे बंधनकारक करण्यात आले आहे. पुणे व्यतिरिक्त मुंबई सीएसएमटी, एलटीटी, नागपूर, कल्याण आणि नाशिक या स्थानकांवरही अशी सुविधा उभारली जात आहे. पुणे रेल्वे विभागाचे विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक हेमंत कुमार बेहरा यांनी सांगितले की, नवीन होल्डिंग एरिया शुक्रवारपासून प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. या जागेत प्रवाशांना थांबवून, त्यांची योग्य रांगेत प्लॅटफॉर्मवर नेण्याची सोय केली जाईल, जेणेकरून प्लॅटफॉर्मवरील अनावश्यक गर्दी टाळता येईल.

ही सुविधा रेल्वे स्थानकाच्या पार्सल कार्यालयासमोरच्या व्हीआयपी साइडिंग परिसरात उभारण्यात आली आहे. एकावेळी 1000 प्रवासी येथे थांबू शकतात. प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, मोबाइल शौचालये, तसेच काही नोंदणीकृत विक्रेत्यांमार्फत खाद्यपदार्थांची विक्री याची सोय करण्यात आली आहे.

प्रामुख्याने उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांचे सामान्य श्रेणीतील प्रवासी या सुविधेचा लाभ घेणार आहेत. झेलम एक्स्प्रेस, आझाद हिंद एक्स्प्रेस आणि दनापूर एक्स्प्रेस यांसारख्या गाड्यांमध्ये प्रचंड प्रवासी गर्दी पाहायला मिळते. या प्रवाशांना आता थेट प्लॅटफॉर्मवर न थांबवता होल्डिंग एरियातून शिस्तबद्ध रित्या नेण्यात येणार आहे. दररोज १.५ ते १.७ लाख प्रवाशांची वर्दळ असलेल्या पुणे स्थानकावर हा बदल स्वागतार्ह मानला जात आहे. स्थानकातील नियमित प्रवाश्यांनी या योजनेचे कौतुक केले असले तरी, व्यवस्थापनाच्या सातत्याबाबत काही शंका व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, सुरक्षा वाढवण्यासाठी स्थानकावर 160 नव्या चेहरा ओळख प्रणालीयुक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. सध्या 70 कॅमेरे कार्यरत असून, नवीन यंत्रणेमुळे सुरक्षा व्यवस्थेत मोठी सुधारणा अपेक्षित आहे.या व्यतिरिक्त, झेलम एक्स्प्रेसने काश्मीरहून परतलेल्या सुमारे 200 प्रवाशांनी पुण्यात सुखरूप पोहोचल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा