ताज्या बातम्या

GST : तुमचा खिसा आणखी रिकामा होणार, सोमवारपासून 'या' वस्तू होणार महाग

Published by : Shweta Chavan-Zagade

महागाईमुळे (Inflation) सर्वसामान्य जनता आधीच त्रस्त झाली आहे. त्यात या नाही तर त्या वस्तूंच्या किमती वाढत आहेत. अशामध्ये 18 जुलैपासून नवीन जीएसटी दर लागू होणार आहेत. 28-29 जून रोजी झालेल्या जीएसटी काउंसिलच्या (GST Council) बैठकीमध्ये जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 18 जुलैपासून याची अंमलबजावणी होणार असल्यामुळे आता सर्वसामान्यांना आणखी महागाईचा सामना करावा लागणार आहे. नव्या जीएसटी दरानुसार, खाणं-पिण्यासह वैद्यकीय उपचारही महागणार आहेत. त्यामुळे महागाई आणखी रडवणार आहे. अन्नधान्यांवरही जीएसटी लागू होणार आहे. धान्य आणि डाळीच्या किंमतीत 8 ते 10 टक्क्यांनी वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले. महागाईचा हा भार ग्राहकांवरच पडणार आहे. शनिवारी व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. त्याच्या परिणामी बाजारपेठांमधील व्यवहार ठप्प होते.

या वस्तूंवर भरावा लागेल जीएसटी –

– टेट्रा पॅक असलेले आणि लेबल केलेले (फ्रोझन वगळता) मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुका मखाना, कोरडे सोयाबीन, मटार, गहू आणि इतर तृणधान्ये आणि तांदूळ यांसारख्या उत्पादनांवर आता 5% जीएसटी लागू होईल. आत्तापर्यंत या वस्तूंना जीएसटीमधून सूट देण्यात आली होती.

– बँकेकडून टेट्रा पॅक आणि चेक जारी करण्याच्या सेवेवर 18 टक्के जीएसटी भरावा लागेल.

– अॅटलससह नकाशे आणि तक्त्यांवर 12 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय लागू होणार आहे.

– मुलांच्या शिक्षणाशी संबंधित साहित्य महाग होणार आहेत. जीएसटी कौन्सिलने प्रिंटिंग-ड्रॉइंग शाई, पेन्सिल शार्पनर, एलईडी दिवा, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादने चाकू, पेपर-कटिंग नाइफ यावरील जीएसटी दर वाढवला आहे. या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी भरावा लागेल.

– सोलर वॉटर हीटर्सवर आता 12 टक्के जीएसटी लागणार आहे. यावर याआधी 5 टक्के जीएसटी भरावा लागत होता.

– एलईडी लाइट्स, एलईडी लॅम्पवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे.

– ब्लेड, पेपर कात्री, पेंसिल शार्पनर, चमचा, काटा चमचा, स्किमर्स आणि केक-सर्व्हर्स आदीवर 18 टक्के दराने जीएसटी द्यावा लागेल. सध्या यावर 12 टक्के जीएसटी आकारला जात आहे.

या वस्तू आणि सेवा होणार स्वस्त

– रोपवेच्या माध्यमातून प्रवास किंवा सामान ट्रान्सपोर्टसाठी लागणाऱ्या जीएसटीमध्ये कपात करण्यात आली आहे. आधी यावर 18 टक्के जीएसटी आकारला जात होता. आता केवळ 5 टक्के जीएसटी आकारण्यात येईल.

– स्प्लिंट्स आणि इतर फ्रॅक्चर उपकरण, शरीराचे कृत्रिम अवयव, बॉडी इंप्लाट्स, इंट्रा ओक्यूलर लेंस आदीवर आधी 12 टक्के जीएसटी आकारण्यात येणार होतात. आता केवळ 5 टक्के जीएसटी आकारण्यात येईल.

– माल वाहतुकीवरील भाड्यावरील जीएसटीमध्ये कपात करण्यात आली आहे. आता 12 टक्के जीएसटी आकारण्यात येईल.

– डिफेंस फोर्सेससाठी इंपोर्ट करण्यात आलेल्या वस्तूवर 18 जुलैपासून जीएसटी लागेल.

आरोग्यसेवा महागणार

रुग्णालयात रुग्णांसाठींच्या 5000 रुपयांहून अधिक शुल्क असलेल्या खोल्यांसाठी (आयसीयू वगळता) पाच टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. त्याशिवाय, जैव-वैद्यकीय कचऱ्यावर (Biomedical Waste ) प्रक्रिया करण्यासाठी किंवा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रक्रियेच्या सुविधेवर 12 टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने या जीएसटी विरोधात केंद्र सरकारला पत्र लिहीले आहे. हा जीएसटी तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

शैक्षणिक वस्तू महागणार

मुलांच्या शिक्षणाशी संबंधित गोष्टी आता महाग होणार आहेत. जीएसटी कौन्सिलने प्रिंटिंग-ड्रॉइंग शाई, पेन्सिल शार्पनर, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादने, पेपर-कटिंग नाइफ यावरील जीएसटी दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे,. त्याशिवाय एटलससह नकाशा आणि चार्टवर 12 टक्के जीएसटी लागू होणार आहे.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...