ताज्या बातम्या

Indian Parliament : गोपनीयतेच्या अनुषंगाने सचिवालयाचे नवे निर्देश; संसद परिसरात स्मार्ट गॅजेट वापरण्यावर बंदी

खासदारांना संसद परिसरात स्मार्ट चष्मा, पेन कॅमेरा आणि स्मार्ट घड्याळे यासारखी स्मार्ट उपकरणे(Smart Gadgets)बुधवारी जारी केलेल्या बुलेटिनद्वारे, लोकसभा सचिवालयाने वापरू नयेत, असे आवाहन केले आहे.

Published by : Varsha Bhasmare

संसदेची सुरक्षा आणि गोपनीयता अधिक बळकट करण्यासाठी लोकसभा सचिवालयाने खासदारांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. खासदारांना संसद परिसरात स्मार्ट चष्मा, पेन कॅमेरा आणि स्मार्ट घड्याळे यासारखी स्मार्ट उपकरणे(Smart Gadgets)बुधवारी जारी केलेल्या बुलेटिनद्वारे, लोकसभा सचिवालयाने वापरू नयेत, असे आवाहन केले आहे. सचिवालयाचे म्हणणे आहे की खासदारांच्या गोपनीयतेला अशा उपकरणांमुळे धोका पोहोचू शकतो आणि संसदेच्या(Parliament) विशेषाधिकारांचे उल्लंघन देखील होऊ शकते.

लोकसभेने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये असे सांगण्यात आले की, आजकाल देशात अनेक प्रकारची आधुनिक आणि प्रगत डिजिटल उपकरणे सहज उपलब्ध आहेत. यामध्ये स्मार्ट चष्मा, कॅमेरा असलेले पेन आणि स्मार्ट घड्याळे यांचा समावेश आहे, ज्यांचा गैरवापर होऊ शकतो.

सचिवालयाने चेतावणी दिली की गुप्त रेकॉर्डिंग किंवा पाळत ठेवण्यासाठी काही उपकरणे वापरली जाऊ शकतात. संसदेत होणाऱ्या चर्चेवर आणि खासदारांच्या सुरक्षा आणि गोपनीयतेवर याचा परिणाम होऊ शकतो. संसद भवन आणि संपूर्ण संसद संकुलात त्यामुळे खासदारांना अशा कोणत्याही उपकरणाचा वापर करू नये, सुरक्षा, गोपनीयता आणि संसदीय शिष्टाचाराला ज्यामुळे हानी पोहोचू शकते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा