१९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी केली जाणार आहे. पुण्यातील सिंहगडावर शिवप्रेमींची वर्दळ मोठ्या प्रमाणात होत असते. त्याचपार्श्वभूमीवर हवेली पोलिसांनी शिवप्रेमींसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे.
सिंहगडावर शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जात असतात. गडावर अवैध रित्या हत्यार घेऊन जाण्यास बंदी केली असून, त्याचबरोबर मोटारसायकलच्या सायलेन्सरचा मोठा आवाज करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर, त्या व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाणार आहे. अशी माहिती सचिन वांगडे, हवेली पोलीस स्टेशन निरीक्षक यांनी दिली आहे.