Latest Marathi News Update live  
ताज्या बातम्या

Latest Marathi News Update live : भाजप आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयात सापडली बंदूक

Marathi Live Headlines Updates: आज शनिवार, दिनांक 14 फेब्रुवारी 2026, आजच्या ताज्या बातम्या, पत्रकार परिषद, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..

Siddhi Naringrekar

Mumbai City : भारतातील सर्वात श्रीमंत शहरांमध्ये मुंबई अव्वल; 27.80 लाख कोटींची अर्थव्यवस्था

देशाच्या आर्थिक प्रगतीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या Mumbai शहराने भारतातील टॉप 10 श्रीमंत शहरांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे.

शहरांच्या एकूण अंदाजित जीडीपीच्या (Gross Domestic Product) आधारे तयार करण्यात आलेल्या या यादीत मुंबईची अंदाजित अर्थव्यवस्था सुमारे 27.80 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Sanjay Kenekar : भाजप आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयात सापडली बंदूक

भाजप आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयात बंदूक सापडली असल्याची माहिती मिळत आहे. भाजप आमदार संजय केणेकर यांच्या भेटीसाठी आलेल्या व्यक्तीच्या बॅगेत बंदूक सापडली.

Bhiwandi : भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांना अटक

भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांना अटक करण्यात आली असून महापालिका निकालानंतर झालेल्या राड्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

Sunetra Pawar :  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीमधील सहयोग निवासस्थानी दाखल

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीमधील सहयोग निवासस्थानी दाखल झाल्या असून थोड्याच वेळात सुनेत्रा पवार जनता दरबाराला हजेरी लावणार आहेत.

Devendra Fadnavis :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दिल्ली दौरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दिल्ली दौरा असून राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट घेतली

आचारसंहिता संपतच निवेदनाचा पडला पाऊस;   मुंबई महापालिकेने केल्या महिन्याभरात 600 कोटींच्या 361 निविदा प्रसिद्ध

आचारसंहिता संपतच निवेदनाचा पाऊस पडला असून मुंबई महापालिकेने केल्या महिन्याभरात 600 कोटींच्या 361 निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत.

Jalgaon : व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर जळगावची बाजारपेठ गुलाबांच्या फुलांनी सजली

व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर जळगावची बाजारपेठ गुलाबांच्या फुलांनी सजली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत गुलाबांच्या फुलांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे.

Metro : मेट्रो 6 डेपोचा मार्ग मोकळा;   जागेवर मालकीचा दावा करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

मेट्रो 6 डेपोचा मार्ग मोकळा झाला असून जागेवर मालकीचा दावा करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

NCP : येत्या दोन आठवड्यात राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची प्रक्रिया पार पडणार

येत्या दोन आठवड्यात राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची प्रक्रिया पार पडणार असून राज्याच्या अधिवेशन काळातच सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्षा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा